Pune: भाजपकडे फक्त १५ तिकीटं मागितलीच कशी? नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप, शिवसैनिकांचा घराला वेढा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पुण्यात युतीमध्ये जागा वाटपावरून प्रचंड धुसफुस आहे. भारतीय जनता पक्षावर शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत.
पुणे : पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाड्यांची चर्चा सुरू असताना इकडे शिवसेना-भाजपमध्येही धुसफूस सुरू असल्याचे चित्र आहे. जागा वाटपाच्या चर्चा सुरू असताना शिवसेनेला झुकते माप देण्यास भारतीय जनता पक्षाने नकार दिला आहे. अगदी १५ पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, असे संकेत भाजपने दिल्यावर शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते चांगलेच खवळले आहेत. त्यांनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील घराच्या समोर आंदोलन केले. तुम्ही भाजपकडे १५ जागा मागितल्याच कशा? अशी विचारणा करून तुम्ही सेटल झालात का? अशी बोचरा सवाल शिवसैनिकांनी गोऱ्हे यांना विचारला.
भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षांत पुणे महानगरपालिकेसाठी युतीच्या चर्चा सुरू आहेत. जागा वाटपाच्या अनुषंगाने चर्चेच्या दोन तीन फेऱ्या संपन्न झाल्या असून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या मागणीनुसार जागा देण्यास भाजपने नकार दिला आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करावा, असा संदेश स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना कळविलेला आहे. अर्ज भरण्याचे दिवस असताना युतीच्या चर्चेत आणि जागा वाटपाचे सूत्र ठरविण्यास विलंब होत असल्याने इच्छुक गॅसवर आहेत. भाजपच्या दबावापोटी कमी जागांवर सेनेने तयारी दर्शवू नये, यासाठी सेनेतील इच्छुक नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर आंदोलन केले.
advertisement
जागा वाटपावरून प्रचंड धुसफुस, नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर आंदोलन
पुण्यात युतीमध्ये जागा वाटपावरून प्रचंड धुसफुस आहे. भारतीय जनता पक्ष शिवसेनेला १५ जागाच द्यायला तयार असल्याने नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर इच्छुकांनी आंदोलन करून आम्हाला न्याय कोण देणार? केवळ १५ जण लढण्यासाठी सक्षम आहेत काय? बाकीच्यांचे काय? अशा सवालांच्या फैरी त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर डागल्या.
advertisement
पुण्यातील सेना नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना
दुसरीकडे शिवसेना नेते रविंद्र धंगेकर, आबा बागूल , अजय भोसले हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. शिवसेनेकडून २५ जागांची मागणी करण्यात आलेली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलून आपण मार्ग काढून कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, असे एकनाथ शिंदे यांना सांगणार असल्याचे नेत्यांनी सांगितले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 12:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune: भाजपकडे फक्त १५ तिकीटं मागितलीच कशी? नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप, शिवसैनिकांचा घराला वेढा










