Uddhav Thackeray Raj Thackeray : उद्धव ठाकरेंची साद, राज ठाकरेंच्या मनात काय? बाळा नांदगावकरांनी स्पष्ट सांगितलं...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Shiv Sena UBT and MNS Alliance News : ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील ठाकरे बंधूंच्या युतीसाठी सकारात्मक असल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनात काय सुरू आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाष्य केले.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी, सोलापूर: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीची चर्चा जोरात सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सभेतही राज ठाकरे यांना युतीसाठी साद घातली आहे. त्याशिवाय, ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील ठाकरे बंधूंच्या युतीसाठी सकारात्मक असल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनात काय सुरू आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाष्य केले.
बाळा नांदगावकर हे खासगी कामाच्या निमित्ताने सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. हिंदी सक्तीच्या मुद्यावर बाळा नांदगावकर यांनी म्हटले की, हिंदी भाषेविषयी आमचं काही वावड नाही. मात्र हिंदी राष्ट्रभाषा नसून राज्यभाषा आहे. कोणत्याही राज्यावरती कोणती भाषा सक्ती होता कामा नये. राज्य निर्मिती झाली त्यावेळेस भाषिक प्रांत रचना झाली होती. पण हिंदी भाषा लादणार असतील तर त्याला कडवटपणे विरोध केला जाईल असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्रिमंडळाला आमची विनंती आहे की गरज नसताना एखांदा विषय वाढवू नये. तो विषय योग्य वेळेला संपवणे चांगला असतं असंही नांदगावकर यांनी म्हटले.
advertisement
ठाकरे बंधू एकत्रित येणार?
उद्धव-राज यांची युती होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. याबाबत बाळा नांदगावकर यांनी म्हटले की, बाळासाहेब ठाकरे असतानाचा तो काळ होता. त्यावेळेस उद्धव आणि राज यांना एकत्र करण्याचा मी प्रयत्न केला.
पण एखादी गोष्ट झाली तर राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असतं. पण पुढे काय होईल याची मला कल्पना नाही.
advertisement
राजकारणात वेळ नेहमीच येत असते मात्र कुठलीच वेळ कधी वाईट नसते. महाभारतात एक वाक्य आहे 'समय बडा बलवान होता है'. या वाक्यात बरेच काही अर्थ असतात, असेही बाळा नांदगावकर यांनी म्हटले.
राज ठाकरे यांच्या मनात काय?
उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीवर सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे यांची भूमिका काय, असा प्रश्न बाळा नांदगावकर यांना विचारण्यात आला. त्यावर बाळा नांदगावकर यांनी म्हटले की, राज ठाकरे यांना देखील मी युतीबाबतचा प्रश्न विचारला. मी देखील राज ठाकरे यांना विचारलं की, तुमच्या मनात नेमकं काय सुरू आहे. पण मला अजून उत्तर सापडत नाही. त्यामुळे उत्तर सापडलं की मी लगेच तुम्हाला सांगेल असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
June 20, 2025 11:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray Raj Thackeray : उद्धव ठाकरेंची साद, राज ठाकरेंच्या मनात काय? बाळा नांदगावकरांनी स्पष्ट सांगितलं...