BMC Election: ठाकरे बंधूंनी कंबर कसली, पण जुने शिलेदार डाव मोडणार! कोणत्या जागांवर 'गेम' करणार?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election: मुंबईतील बंडखोरांकडून ठाकरे फटका बसण्याची शक्यता आहे. सर्वाधिक बंडखोरी ठाकरे गटाकडून झाली असल्याचे समोर आले आहे.
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. तर, दुसरीकडे विजयासाठी प्रत्येक वॉर्डनुसार समीकरणं जुळवण्यावर भर दिला जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. अशातच मात्र, काही जागांवर राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू राजकीय रणनीती आखत असताना दुसरीकडे त्यांच्या शिलेदाराकडून दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील बंडखोरांकडून ठाकरे फटका बसण्याची शक्यता आहे. सर्वाधिक बंडखोरी ठाकरे गटाकडून झाली असल्याचे समोर आले आहे.
advertisement
इतर महापालिकांच्या तुलनेत मुंबईत बंडखोरीचे प्रमाण तुलनेने कमी असले, तरी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशीही अनेक वॉर्डांत बंडखोर मैदानात टिकून राहिलेत. अंतिम क्षणी अनेकांनी आपली बंडखोरी मागे घेतली असली, तरी काही ठिकाणी पक्षांतर्गत नाराजीचा फटका युती–आघाडीला बसण्याची शक्यता कायम आहे. सध्या सर्वाधिक आठ बंडखोर ठाकरे गटात असून, त्यापाठोपाठ भाजपमध्ये पाच जणांनी बंडखोरीचे निशाण फडकावले आहे.
advertisement
यंदा उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी थेट पक्षशिस्त मोडत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. स्वतंत्र निवडणूक चिन्हासह हे बंडखोर रिंगणात उतरल्याने संबंधित वॉर्डांतील लढती अधिक चुरशीच्या झाल्या आहेत.
शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीमुळे ठाकरे गटात बंडखोरीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. यातील काही बंडखोरांनी थेट ‘धनुष्यबाण’ हाती घेतल्याने पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे, भाजपने शिवसेनेला सोबत घेत युतीसाठी ९० जागा सोडल्याने भाजपमधील इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. पक्ष नेतृत्वाने समजूत काढण्याचे प्रयत्न केले असले, तरी पाच वॉर्डांत भाजपचे बंडखोर थेट युतीविरोधात मैदानात उतरले आहेत.
advertisement
हे बंडखोर केवळ संख्येनेच नव्हे, तर प्रभावाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले जात आहेत. त्यांच्या जनमानसातील पकडीमुळे अनेक ठिकाणी लढती तिरंगी, तर काही वॉर्डांत चौरंगी होण्याची चिन्हे आहेत. ही बंडखोरी कोणाच्या अंगलट येणार, हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे. काही वॉर्डांत विजयाचे गणित अवघ्या काही हजार मतांवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हे बंडखोर निर्णायक ठरू शकतात आणि मुंबई महापालिकेच्या सत्तासमीकरणात अनपेक्षित वळण आणू शकतात असे चित्र आहे.
advertisement
>> कोणत्या पक्षाचे बंडखोर मैदानात?
शिवसेना (ठाकरे गट)
चंद्रशेखर वासुदेव वायंगणकर वॉर्ड ९५
कमलाकर नाईक वॉर्ड १६९
सूर्यकांत कोळी वॉर्ड १९३
संगीता विकास जगताप- वॉर्ड १९६
श्रावणी देसाई - वॉर्ड १९७
विजय इंदुलकर वॉर्ड २०२
दिव्या बडवे वॉर्ड २०३
मनसे
अनिशा माजगावकर ११४
भाजप
दिव्या ढोळे वॉर्ड ६० (भाजप मुंबई सचिव होत्या)
नेहल अमर शाह- वॉर्ड १७७
advertisement
जान्हवी जगदीश राणे - वॉर्ड २०५
शिल्पा केळूसकर - वॉर्ड १७३
जान्हवी पाठक - वॉर्ड १८०
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 11:30 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: ठाकरे बंधूंनी कंबर कसली, पण जुने शिलेदार डाव मोडणार! कोणत्या जागांवर 'गेम' करणार?










