BMC Election Shiv Sena UBT : मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्यातच धक्का बसणार?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Shiv Sena UBT BMC Election : शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत सुरू असलेल्या अस्वस्थतेच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. एकाच दिवशी घडलेल्या दोन वेगवेगळ्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई : शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत सुरू असलेल्या अस्वस्थतेच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे. एकाच दिवशी घडलेल्या दोन वेगवेगळ्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. रात्री उशिरा घडलेल्या मोठ्या घडामोडींना ठाकरेंना मोठा बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती झाली आहे. ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. मराठीबहुल भागात शिवसेना ठाकरे गट-मनसे यांच्या उमेदवाराच्या विजयाच्या गणितावर महापालिकेच्या सत्तेची समीकरणे ठरणार आहेत. मात्र, बालेकिल्ल्यातच ठाकरेंना धक्का बसणार असल्याचे म्हटले जात आहे. मनसेच्या दोन माजी नगरसेवकांनी पक्ष सोडल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनाही धक्का बसणार असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
ठाकरेंचा माजी आमदार शिंदेंच्या भेटीला..
मध्यरात्री राजकीयदृष्ट्या मोठी घडामोड झाली. ठाकरे गटाचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख दगडू सकपाळ यांची मंगळवारी मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्यासह निलेश राणे यांनी दगडू सपकाळ यांच्या घरी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना वेग आला आहे. सकपाळ हे ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते मानले जातात. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने पक्षांतर्गत नाराजी आणि संभाव्य हालचालींच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
advertisement
प्रभाग क्रमांक 203 मधून सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ उमेदवारीसाठी इच्छुक होती. मात्र, पक्षाने त्यांना डावलून भारती पेडणेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दगडू सकपाळ नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे.
मनसे उमेदवाराच्या प्रचाराला आमदाराने फिरवली पाठ...
दरम्यान, शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 205 च्या उमेदवार सुप्रिया दळवी यांच्या शिवसेना–मनसे संयुक्त मेळाव्याला शिवडीचे आमदार अजय चौधरी हे अनुपस्थित राहिले. विशेष म्हणजे, मनसेला शिवडी विधानसभेत केवळ एकच जागा मिळाली असतानाही मनसेच्या उमेदवाराच्या मेळाव्याला स्थानिक आमदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. यामुळे महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या मेळाव्यात खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 9:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Shiv Sena UBT : मध्यरात्री मोठी घडामोड, ठाकरेंच्या बड्या नेत्यानं घेतली शिंदेंची भेट, बालेकिल्ल्यातच धक्का बसणार?









