Shivaji Kardile Passed Away : नगरच्या राजकारणातील धुरंधर हरपला! राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन

Last Updated:

Shivaji Kardile Passed Away : राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन
राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन
अहिल्यानगर: राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. आज पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते. शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने अहिल्यानगरच्या राजकारणातील एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
शिवाजी कर्डिले यांनी अहिल्यानगरच्या राजकारणात, सहकार क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले. दूध व्यवसायिक असलेल्या शिवाजी कर्डिले यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून केली. बुऱ्हाणनगरचे सरपंच म्हणून त्यांनी आपली छाप सोडली. 1995 मध्ये नगर–नेवासा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. या काळात शिवसेना–भाजप युतीला बाहेरून पाठिंबा दिला.
advertisement
1999 च्या निवडणुकीत पुन्हा नगर–नेवासा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांना शिवसेना–भाजप युतीकडून पाठिंबा दिला. काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडी सरकारलानंतर अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. याच काळात राज्य मंत्री (मत्स्य, बंदर विकास विभाग) म्हणून कार्य केले.
शिवाजी कर्डिले यांनी 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नगर–नेवासा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. ग्रामीण भागातील विकास, सिंचन, आणि सहकार क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली.
advertisement
2009 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राहुरी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. भाजपमध्ये प्रवेशानंतर जिल्ह्यातील प्रभावी नेत्यांपैकी एक ठरले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राहुरीतून त्यांनी विजय मिळवला. मात्र, 2019 मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला. पुढे 2024 च्या निवडणुकीत भाजपकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. हॉटेलसह  इतर व्यवसायांमुळे ते अहिल्यानगरमधील एक प्रमुख व्यक्ती झाले. 2014 च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती.
advertisement
शिवाजी कर्डिले हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते. काही महिन्यांपूर्वीच संग्राम जगताप यांचे वडील आणि नगरच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते अरुण जगताप यांचे निधन झाले होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shivaji Kardile Passed Away : नगरच्या राजकारणातील धुरंधर हरपला! राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement