Snake News: भर बाजारात थरार! तरुणीनं सापाला बाटलीत उतरवलं, पाहा Video
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
साप, नाग, किंग कोब्रा या धोकादायक आणि विषारी प्राण्यांपासून सर्वांनी भीती वाटते. त्यांना पाहिलं तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. साप, नाग समोर आलं की चांगल्या चांगल्यांची घाबरगुंडी उडते.
बब्बू शेख, येवला : साप, नाग, किंग कोब्रा या धोकादायक आणि विषारी प्राण्यांपासून सर्वांनी भीती वाटते. त्यांना पाहिलं तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. साप, नाग समोर आलं की चांगल्या चांगल्यांची घाबरगुंडी उडते. मात्र काही धाडसी लोक असतात जे त्यांना पकडतात किंवा ते या प्राण्यांना घाबरत नाहीत. अशातच एका धाडसी तरुणीनं जीव धोक्यात घालून दुकानात शिरणाऱ्या नागाला बाटली बंद केल्याची घटना समोर आलीय. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून तरुणीच्या धाडसाचं कौतुक केलं जातंय.
येवल्याच्या शनी पटांगण भागात असलेल्या मुख्य बाजार पेठेतील एका दुकाना समोर फना काढून नाग उभा होता. त्याला पाहून लोकांची गर्दी होऊन तारांबळ उडाली होती. नागाला पकडण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हतं. गर्दीत उभी असलेल्या एका तरुणीने न घाबरता हातात बर्णी घेतली आणि नागा जवळ जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागली.
advertisement
सुमारे 15 ते 20 मिनिटाच्या प्रयत्नानंतर या नागाला बाटलीत बंद करण्यात या तरुणीला यश आलं. नाग बाटलीत बंद होताच उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून या तरुणीचं कौतुक केलं. थोडया वेळात घटनास्थळी सर्प मित्र आले या तरुणीने नागाला त्यांच्याकडे सुपुर्त केलं.
दरम्यान, अचानक साप निघाल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. अडगळीच्या भागांमध्ये शक्यतो हे प्राणी जास्त प्रमाणात लपून बसतात. सर्प मित्रांना बोलावून त्यांना लगेच त्यांच्या हवाली केलं जातं. मात्र बऱ्याचदा सर्प मित्र यायला वेळ लागतो मग गर्दीतील लोकांमधून कोणीतरी असं धाडस करतं आणि त्यांना पकडतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 23, 2024 8:11 PM IST








