advertisement

सर्पदंश झाला तरी जिद्द सोडली नाही, परीक्षा द्यायला पोहोचला दहावीचा विद्यार्थी, लातूरमधील घटना!

Last Updated:

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यात एक चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका १६ वर्षीय विद्यार्थ्याला सर्पदंश झाला होता. तरीही त्याने दहावीची परीक्षा दिली आहे.

News18
News18
अहमदपूर : लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यात एक चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका १६ वर्षीय विद्यार्थ्याला सर्पदंश झाला होता. तरीही त्याने दहावीची परीक्षा दिली आहे. त्याला इंग्रजी पेपरच्या आदल्या रात्री सर्पदंश झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याची प्रकृती पूर्णपणे बरी नसतानाही संबंधित विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रावर जाऊन इंग्रजीचा पेपर दिला आहे. या घटनेनं विद्यार्थ्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
श्रवण जगन्नाथ खाकरे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील माळेगाव खुर्दचा रहिवासी आहे. त्याला इंग्रजी विषयाच्या पेपरच्या आदल्या रात्री सापाने दंश केला होता. मृत्यू समोर दिसत असताना आणि शरीरात विषाचा प्रादुर्भाव असतानाही, केवळ वर्ष वाया जाऊ नये या काळजीपोटी श्रवणने रुग्णालयातून थेट परीक्षा केंद्र गाठले आणि इंग्रजीचा पेपर दिला आहे.
advertisement

नेमकी घटना काय?

शालेय जीवनात दहावीच्या बोर्ड परीक्षेला अत्यंत महत्त्व असतं. या बोर्ड परीक्षेमुळे करिअरला कलाटणी मिळत असते. गुरुवारी दहावी बोर्डाचा इंग्रजीचा पेपर होता. मात्र, बुधवारी रात्री श्रवणला अचानक सर्पदंश झाला. या घटनेनं कुटुंबात एकच खळबळ उडाली. परीक्षेची तयारी पूर्ण झाली असतानाच नियतीने हा घात केला होता. श्रवणला तातडीने अहमदपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
advertisement

डॉक्टरांची रात्रभर झुंज

रुग्णालयातील डॉ. पी. एस. कदम यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्रवणवर तातडीने उपचार सुरू केले. रात्रभर त्याच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे पहाटेपर्यंत त्याच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली, मात्र विषाचा पूर्ण परिणाम अद्याप ओसरलेला नव्हता. शरीर थकलेले होते आणि मानसिक दडपणही मोठे होते. सकाळी उठल्यानंतर श्रवणने पेपरला जाण्याचा हट्ट धरला. प्रकृती पूर्णपणे स्थिर नसतानाही त्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर परीक्षा केंद्रावर जाण्याचा निर्णय घेतला.
advertisement
डॉक्टरांच्या देखरेखीखाली तो परीक्षा केंद्रावर पोहोचला. दोन तास इंग्रजीचा पेपर आत्मविश्वासाने सोडवल्यानंतर तो पुन्हा तातडीने रुग्णालयात दाखल झाला. सध्या श्रवणची प्रकृती स्थिर असून तो डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत आहे. पण सर्पदंश होऊनही तो अशाप्रकारे पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर आल्याने त्याच्या हिमतीचं कौतुक केलं जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सर्पदंश झाला तरी जिद्द सोडली नाही, परीक्षा द्यायला पोहोचला दहावीचा विद्यार्थी, लातूरमधील घटना!
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement