Sindhudurg DCC Bank Bharti 2025 : तरुणांसाठी आनंदाची बातमी! सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

Last Updated:

Sindhudurg DCC Bank Bharti 2025 : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे. लिपिक श्रेणी अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती केली जात आहे.

Sindhudurg DCC Bank Bharti 2025 : तरुणांसाठी आनंदाची बातमी! सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?
Sindhudurg DCC Bank Bharti 2025 : तरुणांसाठी आनंदाची बातमी! सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?
नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. लिपिक श्रेणी अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती केली जात आहे. फार कमी पदांसाठी बँकेत भरती करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ही नोकरी तुमच्या करिअरच्या उद्देशाने खूप चांगली संधी आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदासाठी 73 जागांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. बँकेमध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 असून, ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
बँकेच्या अधिकृत वेबसाइट्स www.thanedistrictbank.com किंवा www.thanedccbank.com वर ऑनलाइन अर्ज करता येतील. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदासाठी 73 जागांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 असून बँकेने दिलेल्या जाहिरातीत वेळेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन असून उमेदवारांची परिक्षाही ऑनलाइनच होणार आहे. उमेदवारांना अर्ज शुल्क देखील ऑनलाइन पद्धतीने 30 सप्टेंबर 2025 तारखेपर्यंत भरावे लागेल. लिपिक पदासाठी अर्ज शुल्क 1500 + जीएसटी भरावा लागणार आहे. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
advertisement
बँकेची संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अर्जदारांनी वेळेआधीच आपला अर्ज भरावा. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी हवी किंवा अर्जदाराकडे कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी हवी. तर अर्जदाराला संगणकाचंही ज्ञान असावं. तो MS-CIT ची परीक्षा उत्तीर्ण असायला हवा. कोणत्याही परिक्षेसाठी गुणांची मर्यादा नाही. त्यामुळे फक्त उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही या बँकेमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता. नोकरीचं ठिकाण सिंधुदुर्ग असून वय जास्तीत जास्त 38 आणि कमीत कमी 21 इतकं हवं आहे. परीक्षेची तारीख बँकेच्या जाहिरातीत नमूद करण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sindhudurg DCC Bank Bharti 2025 : तरुणांसाठी आनंदाची बातमी! सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement