Dhananjay Munde Anjali Damania : ''पंकजा मुंडेंविरोधात धनंजय मु्ंडेंनी....''अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

Last Updated:

Dhananjay Munde Anjali Damania : धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाचा घोटाळा बाहेर काढताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. e

News18
News18
मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. अंजली दमानिया यांनी आज धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र घनवट यांचा घोटाळा बाहेर काढला. घनवट यांनी शेतकऱ्यांना धमकी देत राजकारणी लोकांच्या मदतीने जमिनी लाटल्या असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. त्याशिवाय, धनंजय मुंडे यांच्याबाबत दमानिया यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला.

अंजली दमानियांनी काय म्हटले?

मुंबईत आज पीडित शेतकऱ्यांसोबत अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली. धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी राजेंद्र घनवट यांनी राजकारण्यांना हाताशी धरत त्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप दमानिया यांनी केला. पीाडितांवर खोटे गुन्हे दाखल त्यांना जेरीस आणले. मयत व्यक्तीला जिवंत दाखवलं जिवंत यांना मयत केलं आणि व्यवहार केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. घनवट यांनी धनंजय मुंडे यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या. या जमिनीवर इमारती आणि प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न झाला. वाल्मिक कराडच्या अनेक प्रॉपर्टी पुण्यात आहेत त्याचा याच्याशी काही संबंध आहे का हे तपासायला हवं अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी केली.
advertisement

20 कोटीच्या जमिनीचा 8 लाखात व्यवहार...

अंजली दमानिया यांनी म्हटले की, घनवट यांनी 11 शेतकऱ्यांना छळून त्रास दिला आहे. त्यातील एका शेतकऱ्याच्या जमिनीचा भाव हा 20 कोटी होता. मात्र, या जमिनीचा व्यवहार अवघ्या 8 लाखात झाल्याचा आरोप करण्यात आला. व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनी संदर्भात मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना भेटले आहे. यात दोन संचालक आहेत त्यातील एक राजेंद्र घनवट आणि पोपटराव घनवट. या दोघांनी 11 शेतकऱ्यांना छळून त्रास दिलाय. जे जे शेतकरी यांच्या विरोधात लढायचे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात, असा आरोपही दमानिया यांनी केला.
advertisement

धनंजय मुंडेंनी घेतली होती भेट...

अंजली दमानिया यांनी आज आणखी एक गौप्यस्फोट केला. धनंजय मुंडे हे 4 वर्षांपूर्वी माझ्याकडे तेजस ठक्कर यांच्या सोबत आले होते. तेव्हा पंकजा मुंडे यांच्या विरोधात पुरावे घेऊन प्रकरण लावून धरा यासाठी धनंजय मुंडे आले होते. यावेळी राजेंद्र घनवटही त्यांच्यासोबत होते. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंविरोधातल्या सगळ्या फाईल्स आणल्या होत्या. मात्र, आपण कोणाच्याही सांगण्यावरून आरोप करत नाही. आपल्याला याचा अभ्यास करून बोलणार असल्याचे धनंजय मुंडेंना सांगितल्याचे दमानियांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhananjay Munde Anjali Damania : ''पंकजा मुंडेंविरोधात धनंजय मु्ंडेंनी....''अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement