advertisement

प्रेमासाठी वाट्टेल ते! पळून गेलेली तरुणी 23 दिवसांनंतर पोलीसांसमोर; वडिलांना म्हणली...

Last Updated:

हवालदिल झालेल्या वडिलांनी अखेर मंगळवेढा पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

बॉलिवूडची 'आऊट ऑफ द बॉक्स' उदाहरणेआजची पिढी या जुन्या नियमांना छेद देताना दिसतेय. बॉलिवूडमधील काही जोड्यांकडे पाहिल्यास लक्षात येते की, समजूतदारपणा असेल तर वय आड येत नाही:शाहिद कपूर - मीरा राजपूत: यांच्यात 15 वर्षांचे अंतर असूनही त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी आहे.रणबीर कपूर - आलिया भट्ट: यांच्यात 11 वर्षांचे अंतर आहे.प्रियांका चोप्रा - निक जोनास: इथे तर प्रियांका तिच्या पतीपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे, तरीही त्यांचे नाते जागतिक स्तरावर चर्चेत असते.

सोलापूर : कचरेवाडी परिसरातून 28 फेब्रुवारी रोजी रहस्यमयरित्या बेपत्ता झालेली 21 वर्षीय तरुणी अखेर पोलिसांसमोर हजर झाली आहे. कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली ही तरुणी बेपत्ता नसून, तिने आपल्या 27 वर्षीय प्रियकरासोबत नरसोबावाडी (जि. कोल्हापूर) येथे जाऊन रीतसर विवाह केल्याचे उघड झाले आहे. या नाट्यमय घडामोडीमुळे कचरेवाडी आणि मंगळवेढा परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.30 वाजता एखतपूर येथील अध्यापक महाविद्यालयात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र, संध्याकाळ झाली तरी ती घरी परतली नाही. नातेवाईक आणि मित्रमंडळींकडे चौकशी करूनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. हवालदिल झालेल्या वडिलांनी अखेर मंगळवेढा पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
advertisement

पोलीस आणि कुटुंबीयांनाही मोठा धक्का

पोलीस नाईक रवींद्र बाबर या प्रकरणाचा तपास करत होते. पोलीस तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेत असतानाच, अचानक ही तरुणी तिच्या 27 वर्षीय पतीसोबत पोलीस ठाण्यात हजर झाली. आपण दोघांनी प्रेमसंबंधातून नरसोबावाडी येथे जाऊन धार्मिक विधी पार पाडून लग्न केले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या खुलाशामुळे पोलीस आणि कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला.
advertisement

पतीसोबत राहण्याचा घेतला निर्णय

तपास अधिकारी रवींद्र बाबर यांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार तरुणीचा जबाब नोंदवून घेतला. यावेळी पोलिसांनी तिला तिची इच्छा विचारली असता, तिने वडिलांकडे न जाता आपल्या पतीसोबतच संसार थाटण्याचा ठाम निर्णय व्यक्त केला. तरुणी सज्ञान असल्याने आणि लग्नाचे कायदेशीर पुरावे सादर केल्याने, पोलिसांनी तिला तिच्या पतीसोबत सासरी जाण्याची परवानगी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्रेमासाठी वाट्टेल ते! पळून गेलेली तरुणी 23 दिवसांनंतर पोलीसांसमोर; वडिलांना म्हणली...
Next Article
Maharashtra Kesari : 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यावर बक्षिसांचा पाऊस, रोख रक्कम अन् फॉर्च्युनर गाडी, कोण बाजी मारणार?
'महाराष्ट्र केसरी' विजेत्यावर बक्षिसांचा पाऊस, रोख रक्कम अन् फॉर्च्युनर गाडी, कोण बाजी मारणार?
  • महाराष्ट्र केसरीचा विजेता मालामाल होणार

  • फॉर्च्युनर गाडीसह रोख बक्षीस मिळणार

  • मानाची गदा कोण पटकावणार?

View All
advertisement