Dr Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकरांनी स्वत:च्या डोक्यात गोळी घातली, रक्ताळलेल्या वडिलांवर मुलाने केले उपचार!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Solapur Dr Shirish Valsangkar News : सोलापुरातील सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Solapur Doctor Shirish Valsangkar : सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टरने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. सोलापुरातील सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. रात्री साडेआठच्या सुमारास डॉ. शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळी घातल्याचा प्रकार समोर घडला. घरातील सदस्यांनी डॉ. वळसंगकर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं, पण स्वत:च्या मुलाला त्यांना वाचवता आलं नाही.
नेमकं काय घडलं?
शिरीष वळसंगकर हे रात्री 8 वाजता घरात कुटुंबासोबत जेवण करीत होते. 8.30 वाजता ते अचानक उठले आणि बाथरूममध्ये गेले. त्यांनी स्वतःच्या बंदुकीने डोक्यात गोळी घातली अन् स्वत:ला संपवलं. गोळी लागताच कुटूंबियांनी धाव घेतली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोळी लागल्यानंतर लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं अन् उपचार सुरू केले. मात्र, त्यांना वाचवण्यात स्वत:च्या मुलाला देखील अपयश आलं.
advertisement
मुलाने स्वत:च्या हाताने वडिलांवर केले उपचार
शिरीष वळसंगकर यांचे चिरंजीव अश्विन वळसंगकर हेही डॉक्टर आहेत. अश्विन वळसंगकर यांनीच आपल्या वडिलांवर प्राथमिक उपचार केले, पण साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच अनेक सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली. हॉस्पिटलमधील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.
कोण होते डॉ. शिरीष वलसंगकर?
advertisement
डॉ. शिरीष वलसंगकर यांनी सोलापूर येथील डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये शिक्षण घेतले आणि सन्मानाने पदवी प्राप्त केली. विज्ञानाची पूर्व-पदवी सन्मानाने उत्तीर्ण झाली आणि प्री-प्रोफेशनल सन्मानाने उत्तीर्ण झाली आणि वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले. त्यांनी अनुक्रमे शिवाजी विद्यापीठ आणि लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस, एमडी आणि एमआरसीपी पदवी मिळवली. ते मराठी, कन्नड, इंग्रजी आणि हिंदी या चार भाषांमध्ये संवाद साधू शकत होते.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Apr 19, 2025 9:07 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Dr Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकरांनी स्वत:च्या डोक्यात गोळी घातली, रक्ताळलेल्या वडिलांवर मुलाने केले उपचार!






