Sonia Gandhi Health: शिमल्यात असताना सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात भरती
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sonia Gandhi Health Update: सोनिया गांधी यांचा एमआरआय करण्यात येणार असून इतरही काही आरोग्य तपासण्या करण्यात येणार असल्याचे इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची अचानकपणे तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीन रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांना आरोग्य तपासणीसाठी शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोनिया गांधी यांचा एमआरआय करण्यात येणार असून इतरही काही आरोग्य तपासण्या करण्यात येणार असल्याचे इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांच्या हवाल्याने हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे प्रमुख माध्यम सल्लागार नरेश चौहान यांनी दिली.
७८ वर्षांच्या सोनिया गांधी कोरोनानंतर सतत आजारी
सोनिया गांधी या शिमल्याच्या खासगी दौऱ्यावर होत्या. आज सायंकाळी सोनिया गांधी यांची तब्येत अचानक ढासळली. लगोलग त्यांना शिमल्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून सोनिया गांधी या श्वसनाच्या विकाराने आणि कोरोनोत्तर आजारांनी त्रस्त आहेत. सन २०२२ मध्ये श्वसनाच्या आजारांवरील उपचारासाठी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर जून २०२२ मध्ये त्यांना कोरोना झाल्यानंतर पुन्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पुन्हा सप्टेंबरमध्ये तब्येत ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.
advertisement
सोनिया गांधी ७८ वर्षांच्या आहेत. त्यांचे वाढते वय आणि वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन नियमित तपासणी आणि उपचार केले जात आहेत. त्यांचे वाढते वय लक्षात घेता त्यांच्या प्रकृतीबाबत राहुल आणि प्रियांका गांधी खूपच दक्षता घेतात. प्रियंका गांधी वाड्रा आणि राहुल गांधी त्यांच्या उपचारादरम्यान नेहमीच रुग्णालयात उपस्थित असतात.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
June 07, 2025 7:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sonia Gandhi Health: शिमल्यात असताना सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात भरती