विद्यार्थ्याला 3 तास स्टम्पने मारहाण, सिनिअर्सकडून रॅगिंग; धाराशिवच्या महाविद्यालयातील घटनेने सर्व हादरले, नेमकं काय घडलं?

Last Updated:

मारहाणीत विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत

News18
News18
धाराशिव : जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात रॅगिंगचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात अकरावीतील एका विद्यार्थ्याला बारावीच्या चार विद्यार्थ्यांनी तब्बल तीन तास खोलीत कोंडून ठेवत बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयातील बारावीच्या काही विद्यार्थ्यांनी त्याला जबरदस्तीने वसतिगृहातील एका खोलीत नेले. तेथे रूम स्वच्छ करणे, झाडू मारणे तसेच इतर कामे करण्यास सांगण्यात आली. मात्र, या कामांना नकार दिल्याने संतप्त झालेल्या चार विद्यार्थ्यांनी त्याला लाकडी स्टम्पने जबर मारहाण केली. ही मारहाण सुमारे तीन तास सुरू होती, असा आरोप पीडित विद्यार्थ्याने केला आहे.
advertisement

मारहाणीत विद्यार्थ्याचा कान निकामी

मारहाण करणारे विद्यार्थी दारूच्या नशेत असल्याचा गंभीर आरोपही पीडित विद्यार्थ्याने केला आहे. या हल्ल्यात विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली असून डोक्याला जबर मार बसला आहेत. विशेष म्हणजे, या मारहाणीत विद्यार्थ्याचा एक कान निकामी झाला असून त्याला नीट ऐकू येत नसल्याची तक्रार डॉक्टरांकडे करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया देण्यास महाविद्यालयाचा स्पष्ट नकार

advertisement
या घटनेनंतरही संबंधित महाविद्यालय प्रशासनाने कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नसून, या प्रकारावर चर्चा करण्यास किंवा प्रतिक्रिया देण्यास महाविद्यालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे महाविद्यालय प्रशासन दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडित विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे.

घटनेमुळे संतापाचे वातावरण 

दरम्यान, या गंभीर घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रॅगिंगसारख्या बेकायदेशीर आणि अमानवी कृत्यांवर कठोर कारवाईची मागणी होत असून, संबंधित आरोपी विद्यार्थ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी पालक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अगोदर मुंबईथ रॅगिंगसंदजर्भात एक भयानक घटना घडली होती. 2019 मध्ये रॅगिंगला कंटाळून नायर हॉस्पिटलमधील डॉक्टर पायल तडवी हिने हॉस्टेलच्या रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती.  या घटनेने खळबळ उडाली आहे.
advertisement
हे ही वाचा :
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विद्यार्थ्याला 3 तास स्टम्पने मारहाण, सिनिअर्सकडून रॅगिंग; धाराशिवच्या महाविद्यालयातील घटनेने सर्व हादरले, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement