हसत हसत भाषण करत होती, दुसऱ्याच क्षणी मृत्यूनं गाठलं, निरोप समारंभातच मुलीचा दुर्दैवी अंत

Last Updated:

Female Student Died on Stage in Dharashiv: धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तालुक्यात एका २० वर्षीय विद्यार्थिनीचा व्यासपीठावरच मृत्यू झाला आहे.

News18
News18
बालाजी निरफळ, धाराशिव प्रतिनिधी: धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं निरोप समारंभात भाषण करत असताना एका २० वर्षीय विद्यार्थिनीचा व्यासपीठावरच मृत्यू झाला आहे. मयत विद्यार्थिनी व्यासपीठावर हसत हसत भाषण करत होती. तिच्या भाषणातील मुद्दे ऐकून इतर विद्यार्थी खळखळून हसत होते. पण यांचा हा आनंद क्षणात विरला. व्यासपीठावरच तरुणीला मृत्यूने गाठलं.
वर्षा खरात असं मृत पावलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीचं नाव आहे. ती धाराशीव जिल्ह्यातील परंडा शहराच्या एसजेआरजे शिंदे महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. घटनेच्या दिवशी शाळेत विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळेचे विद्यार्थी व्यासपीठावर जाऊन आपापल्या भावना व्यक्त करत होते.
दरम्यान, मयत वर्षा खरात देखील भाषण करण्यासाठी व्यासपीठावर गेली. तिने व्यासपीठावर उभं राहून भाषण केलं, उपस्थित विद्यार्थ्यांना खळखळून हसवली. स्वत:ही हसत भाषण करू लागली. पण पुढच्याच क्षणात ती स्टेजवर कोसळली. हसत हसत भाषण करणारी मुलगी अशाप्रकारे खाली कोसळल्याने व्यासपीठावरील शिक्षक आणि समोर बसलेले विद्यार्थी डायसजवळ गेले. त्यांनी तातडीने वर्षाला शासकीय रुग्णालयात हलवलं.
advertisement
पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तिला मयत घोषित केलं. या सगळ्या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओत वर्षा हसत हसत भाषण करताना दिसत आहे. अशा हसत्या खेळत्या मुलीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने महाविद्यालयासह शहरात हळहळ व्यक्त केली जातीय.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हसत हसत भाषण करत होती, दुसऱ्याच क्षणी मृत्यूनं गाठलं, निरोप समारंभातच मुलीचा दुर्दैवी अंत
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement