शिवसेनेविरोधात भाजप-राष्ट्रवादीची युती, गोगावलेंच्या बालेकिल्ल्यात खेळी, तटकरेंचे शिंदेसेनेला चॅलेंज
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघातील महाड नगर पालिकेसाठी राष्ट्रवादी , भाजप युतीने आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.
मोहन जाधव, प्रतिनिधी, रायगड: रायगड जिल्ह्यातील महायुतीत जोरदार संघर्ष आहे. जिल्ह्यातील नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप सोबत युती केली. मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघातील महाड नगर पालिकेसाठी राष्ट्रवादी , भाजप युतीने आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. जाकमाता मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये खासदार सुनील तटकरे , भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि खासदार धैर्यशील पाटील उपस्थित होते. तटकरे यांनी यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या वक्तव्याची दखल घेत चांगलेच सुनावले.
रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि अजितदादांचे राष्ट्रवादी यांच्यातील वाद अजूनही थांबत नाहीये. जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार आणि सुनील तटकरे यांच्या संघर्ष सुरूच आहे. निवडणुकीच्या तोंडावर सेना-राष्ट्रवादीमधील वाद उफाळून आला आहे.
राष्ट्रवादी सोबत युती नको, शिवसेनेने भूमिका घेतली, मग आम्हीही भाजपसोबत युती केली
माझ्यावर अत्यंत अश्लाघ्य शब्दांत टीका करून सुरूवातीपासूनच राष्ट्रवादी सोबत युती नको अशी भूमिका शिवसेनेने घेतली. त्यामुळे जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीने युती केल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या निवडणूक निकालांत आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असेही तटकरे म्हणाले.
advertisement
दळवींनी केलेली वक्तव्ये निंदनीय, सततच्या टीकेमुळे भाजपसोबत युतीचा निर्णय
शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी काल सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा आज सुनील तटकरे यांनी महाड येथे उमेदवारी अर्ज दाखल करताच चांगलाच समाचार घेतला. दळवींनी केलेली वक्तव्ये ही निंदनीय आहेत. माझावर टीका करणारी माणसे ही न्यूनगंड आणि भयगंडाने पछाडलेली असून आम्ही भाजप आणि राष्ट्रवादी नेटाने काम करू, असा इशारा त्यांनी शिंदे सेनेच्या आमदारांना दिला.
view commentsLocation :
Raigad,Maharashtra
First Published :
November 16, 2025 3:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिवसेनेविरोधात भाजप-राष्ट्रवादीची युती, गोगावलेंच्या बालेकिल्ल्यात खेळी, तटकरेंचे शिंदेसेनेला चॅलेंज


