शर्लिन चोप्राने अखेर काढून टाकले हेव्ही ब्रेस्ट इम्प्लांट, काही महिन्यांपासून होता भयंकर त्रास
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Sherlyn Chopra : भारतीय मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राची अखेर शस्त्रक्रिया पार पडली आहे. अभिनेत्रीने हेव्ही ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकले आहेत.
Sherlyn Chopra : अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा सध्या चर्चेत आहे. शर्लिन अखेर शस्त्रक्रिया पार पडली आहे. अभिनेत्रीने हेव्ही ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शर्लिनला पाठ, छाती आणि मानदुखीचा भयंकर त्रास होत होता. आता सोशल मीडियावर शर्लिनने
सिलिकॉन इम्प्लांट्सचा फोटो शेअर केला. याचं वजन 825 ग्रॅम होते. फोटो शेअर करत शर्लिनने लिहिलं आहे,"सिलिकॉन-फ्री! आता खूप हलकं वाटतंय". एका व्हिडिओमध्ये शर्मिलीनं इम्प्लांट्स हातात घेऊन लोकांना सांगितलं आहे की, अशी चूक पुन्हा कोणी करू नये".
शर्लिनने शस्त्रक्रियेसाठी आपल्या डॉक्टर्सच्या टीमचे आभार मानले. व्हिडिओमध्ये इम्प्लांट्स हातात घेत शर्लिनने लोकांना सावध करत सांगितलं की तिनं केलेली चूक कोणीही करू नये. तिनं हे किती वेदनादायक ठरू शकतं, हेही स्पष्ट केलं. कॅप्शनमध्ये शर्लिनने लिहिलं आहे,"माझा ठाम विश्वास आहे की अनावश्यक ओझं घेऊन जगण्यात काही अर्थ नाही. ही माझी वैयक्तिक मते आहेत… प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात. माझ्या ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरीसाठी माझ्या हुशार डॉक्टर्सच्या टीमचे मनःपूर्वक आभार.”
advertisement
advertisement
शर्लिनला होता भयंकर त्रास
शर्लिनने उघड केलं की तिला अनेक महिन्यांपासून पाठ, छाती, मान आणि खांदेदुखीचा त्रास होत आहे. अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर समजलं की तिच्या लक्षणांचे कारण हेच इम्प्लांट्स होते. छातीवर सततचा दबाव आणि स्नायूंवरील ताण यामुळे तिचं आयुष्य कठीण झालं होतं. शर्लिनने याआधी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिला होणाऱ्या त्रासाबाबत चाहत्यांना सांगितलं होतं. तसेच यावेळीच तिने हेव्ही ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकणार असल्याचंही बोलली होती. शर्लिनला चाहते आता आराम करण्याचा सल्ला देत आहे. तसेच तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
advertisement
इम्प्लांट्सबाबत डॉक्टरांचा काय आहे सल्ला?
view commentsस्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. ईशा नंदल यांच्या मते, ब्रेस्ट इम्प्लांट्समुळे छातीवर अतिरिक्त भार पडतो. ज्यामुळे वरच्या शरीरातील स्नायूंवर ताण येतो आणि झोपेच्या तक्रारीही होऊ शकतात. शस्त्रक्रियेनंतर शर्लिन आता आपल्या प्रकृतीची काळजी घेत आहे. तसेच लेटेस्ट फोटोमध्ये अभिनेत्री आनंदी दिसत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2025 3:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
शर्लिन चोप्राने अखेर काढून टाकले हेव्ही ब्रेस्ट इम्प्लांट, काही महिन्यांपासून होता भयंकर त्रास


