IND vs SA : आधी बुटका म्हणाला, मग चूक सुधारली... मॅचनंतर बुमराहने बऊमासोबत काय केलं? Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. या सामन्यानंतर टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाला जाऊन भेटला आहे.
कोलकाता : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 124 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या इनिंगमध्ये भारताचा 93 रनवर ऑल आऊट झाला. मॅचच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाच्या नाबाद 55 रनमुळे दक्षिण आफ्रिकेने 153 रन केले, यानंतर पहिल्या इनिंगच्या 30 रनच्या आघाडीमुळे भारताला 124 रनचं आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली.
स्कोअरबोर्डवर एक रन असतानाच भारताचे दोन्ही ओपनर पॅव्हेलियनमध्ये परतले, त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने किल्ला लढवला, पण एका बाजूने विकेट जातच होत्या. सुंदरने सर्वाधिक 31 रन केले तर अक्षर पटेलने 26 रनची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून सिमन हार्मरने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर मार्को यानसन आणि केशव महाराजला 2-2 विकेट घेण्यात यश आलं. एडन मार्करमनेही 1 विकेट घेतली.
advertisement
Pic 1- Bumrah to Bavuma : Sorry bhai Maine tujhe Bauna Bhola….
Pic 2 Bavuma : but bhai ye Bauna Kyaa Hota Hai#INDvsSA pic.twitter.com/pDwCZVcjGe
— (@Jaideep_jd_) November 16, 2025
Bumrah explaining the Bauna controversy to Bavuma crying pic.twitter.com/l9WTsYcCkZ
— tweeting from my grave. (@kalhonahoooooo) November 16, 2025
advertisement
बुमराह-बऊमाचा वाद मिटला
दरम्यान मॅच संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमा आणि जसप्रीत बुमराह यांच्यातला वाद मिटला आहे. बुमराहने जवळ जाऊन बऊमाला हस्तांदोलन केलं. याच मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये बुमराह बऊमाला बुटका म्हणाला होता. एलबीडब्ल्यूचा डीआरएस घ्यायचा का नाही? याबद्दल टीम इंडियाची चर्चा सुरू होती, तेव्हा बुमराह डीआरएस घे, हा बुटका आहे, असं कर्णधार गिलला म्हणाला. बुमराहचं हे वक्तव्य स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झालं, यानंतर मोठा वाद निर्माण झाला.
advertisement
बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचा अपमान केला असून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांनी केली, पण आता मॅच संपल्यानंतर बुमराह बऊमाला जाऊन भेटला आणि त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला हस्तांदोलनही केलं.
view commentsLocation :
Kolkata,West Bengal
First Published :
November 16, 2025 2:58 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : आधी बुटका म्हणाला, मग चूक सुधारली... मॅचनंतर बुमराहने बऊमासोबत काय केलं? Video


