Supreme Court On Shivsena: शिवसेना अन् 'धनुष्यबाण' कोणाचा, ठाकरे की शिंदे? सुप्रीम कोर्टातून आली मोठी अपडेट
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Supreme Court On Shivsena : सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना सत्तासंघर्ष, पक्ष आणि निवडणूक चिन्ह वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना सत्तासंघर्ष, पक्ष आणि निवडणूक चिन्ह वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील वाद गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहे. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा, यावर सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी होणार असल्याने राज्याचे लक्ष सुप्रीम कोर्टाकडे लागले होते.
सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता शिवसेना निवडणूक चिन्ह आणि पक्ष कोणाचा यावरील सुनावणी शुक्रवारी होणार असल्याची माहिती आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी ही सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे.
आज सुनावणी का नाही?
सरन्यायाधीश सूर्य कांत आज केवळ दुपारी 1 वाजेपर्यंतच नियमित कामकाज पाहणार आहेत. त्यानंतर सरन्यायाधीश हे न्यायमूर्ती जोयमाला बागची यांच्यासह ‘अरवली डोंगररांगा’ प्रकरणाच्या विशेष सुनावणीत व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित प्रकरणांना पुरेसा वेळ मिळणे अवघड असल्याचे चित्र आहे. शिवसेना निवडणूक चिन्ह आणि पक्षाबाबतची सुनावणी ही आजच्या कामकाजाच्या यादीत ३७ व्या क्रमांकावर होती. त्यामुळे आज सुनावणी होणे अशक्य असल्याचे म्हटले जात होते. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्यासाठी तीन-तीन तासांचा वेळ दिला आहे. या वेळेत दोन्ही बाजूच्या वकिलांना युक्तिवाद करावा लागणार आहे.
advertisement
गेल्या अनेक महिन्यांपासून तारीख पे तारीख मिळत असल्याने राजकीय वर्तुळात अस्वस्थता होती. मात्र, आता पुढे होणारी ही सुनावणी 'अंतिम' आणि 'निर्णायक' असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निकालावर राज्यातील आगामी निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असल्याने दोन्ही गटांची धाकधूक वाढली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 11:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Supreme Court On Shivsena: शिवसेना अन् 'धनुष्यबाण' कोणाचा, ठाकरे की शिंदे? सुप्रीम कोर्टातून आली मोठी अपडेट








