Suresh Dhas : लोकसभेला पंकजाताई धनंजय मुंडे, वाल्मिक कराडमुळेच पडल्या, सुरेश धसांचा मोठा गौप्यस्फोट

Last Updated:

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका आहे. पण आकाचा आका याचं इतक्या लवकर नाव नाही घेणार. यासाठी थोड थांबाव लागेल. इतक्या लवकर त्यांना लगेच आरोपी ठरवणे योग्य नाही. परंतू राजीनामा मात्र त्यांनी दिला पाहिजे.

suresh dhas big revealation
suresh dhas big revealation
Suresh Dhas News: बीड मतदार संघातून पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुक लढली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाला समोरे जावे लागले. तब्बल साडे सहा हजारांनी पराभव झाला होता. या पराभवावर बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमुळेच पडल्या,असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
भाजप आमदार सुरेश धस टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. या मुलाखतीत सुरेश धस यांनी पंकजा मुंडे लोकसभेत नेमक्या कशा पडल्या? पंकजा मुंडे यांना कोणी पाडलं? याची माहिती दिली आहे. धनंजय मुंडेंपेक्षा आकाची (वाल्मिक कराड) दहशत जास्त आहे. आकाने (वाल्मिक कराड) धनंजय मुंडेंवर पुर्ण वशीकरण केलं आहे,असे सुरेस धस यांनी म्हटलं आहे.
advertisement
धनंजय मुंडेंचा मित्रच वाल्किम कराडने शिल्लकच ठेवला नाही. त्याने बरोबर सगळ्यांचे काटे काढले. बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे चांगले मित्र होते. या दोघांच्या मित्रत्वाचं वाटोळं विष्णु चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनी केलं.तेव्हापासून बजरंग बाप्पा विरोधात गेला. बजरंग बाप्पा जर विरोधात गेले नसते तर पंकजा मुंडे लोकसभेला पडल्याच नसत्या,असा खळबळजनक खुलासा सुरेश धस यांनी केला.
advertisement
सुरेश धस पुढे म्हणाले, बजरंग सारखा तगडा उमेदवार होता. बजरंग बाप्पा बोलेला अशी छाती फाडली तर या बाजूला अजित पवार दिसतील तर या बाजुला धनंजय मुंडे दिसतील. पण त्याची छातीही फाडायची गरज पडली नाही तो गेला उभा राहिला आणि आमचं सीट पडलं. त्यामुळे माझ्याबद्दल त्यांचा (पंकजा मुंडे) गैरसमज निर्माण झाली. माझ्यामुळेच का झाला माहित नाही, पण साडे 32 हजाराची मी लिड दिलं होतं, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.
advertisement

धनंजय मुंडेंचा हत्या प्रकरणात हात नसेल

पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, या हत्या प्रकरणात आका आहे. पण आकाचा आका याचं इतक्या लवकर नाव नाही घेणार. यासाठी थोड थांबाव लागेल. इतक्या लवकर त्यांना लगेच आरोपी ठरवणे योग्य नाही. परंतू राजीनामा मात्र त्यांनी दिला पाहिजे. हे माझं प्रामाणिक मतं आहे. त्यांना राजीनामा द्यायला अजित पवारांनी भाग पाडावं, असं मला वाटतं,अशी भूमिका देखील सुरेश धसांनी मांडली.
advertisement
आकाच्या (वाल्मिक कराड) आकाने (धनंजय मुंडे) व्हिडिओ पाहिला असेल तर त्याला जेलवारी झाली पाहिजे. पण मोठ्या आकाने (धनंजय मुंडे) व्हिडिओ पाहिला असेल असं मला वाटत नाही. माझं हदय सांगत धनंजय मुंडेंनी तो व्हिडिओ पाहिला असे मला वाटत नाही. पण आकाने शंभर टक्के पाहायला असेल, असे देखील सुरेश धसांनी स्पष्ट सांगितलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Suresh Dhas : लोकसभेला पंकजाताई धनंजय मुंडे, वाल्मिक कराडमुळेच पडल्या, सुरेश धसांचा मोठा गौप्यस्फोट
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement