नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर संशयास्पद बॅग, ट्रॉली घेऊन येणारा व्यक्ती CCTVत कैद
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार नितेश राणे यांच्याबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर एक संशयास्पद बॅग आढळली आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार नितेश राणे यांच्याबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर एक संशयास्पद बॅग आढळली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ही बॅग नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर ठेवून पळ काढला आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस बॅग ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
मागील काही दिवसांपासून नितेश राणे हे हिंदुत्ववादीची प्रखर भूमिका मांडत आहेत. यामुळे यापूर्वी त्यांना अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नितेश राणे यांच्या घरासमोर बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ही बॅग नेमकी कुणी ठेवली? बॅगमध्ये काय आहे? याची कसलीही माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेची माबिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी रवाना झालं आहे. बॅगमध्ये नक्की काय आहे? याचा शोध घेतला जात आहे. ही सगळा प्रकार नितेश राणे यांच्या मुंबईतील सुवर्णगड बंगल्याच्या बाहेर घडला आहे. अशा प्रकारे अज्ञाताने नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बॅग सोडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या घटनास्थळी बॉम्बस्कॉड कडून बॅगची झडती घेतली जात आहे.
advertisement
मुंबईत नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर अज्ञाताने संशयास्पद बॅग ठेवली. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल... pic.twitter.com/agOKNEwHPS
— News18 Marathi (@News18lokmat) January 11, 2026
गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी प्रचार पॅटर्नमुळे त्यांना धमकावण्याचे प्रकार घडले होते. यातच अनेक ठिकाणी झालेल्या हिंदुत्ववादी वादग्रस्त भाषण स्टाईलमुळे नितेश राणे चर्चेत आले होते. सध्या मुंबईत महापालिका निवडणुकीचा प्रचार जोमात आहे. निवडणुकीच्या काळातच असा प्रकार घडल्याने याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 10:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर संशयास्पद बॅग, ट्रॉली घेऊन येणारा व्यक्ती CCTVत कैद








