advertisement

Beed: आधी 50 हजारांवर बोली नंतर 20 वर सेटलमेंट, मुंडे असा सापडला ACB च्या जाळ्यात, बीडकरांनी फटाके फोडले

Last Updated:

या कारवाईनंतर तहसील परिसरात उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी फटाके फोडत आतिषबाजी केली.

News18
News18
बीड : राज्याच्या विकास कामाचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात अन्न आणि औषध मंत्री नरहरी झिरवळ यांच्या विभागात लाच स्वीकारण्याचा प्रकार समोर आला होता. सरकारी अधिकारी किती लाचखोर झाले आहे, याचे अनेक प्रकरण समोर येत आहे. अशातच बीड जिल्ह्यात  ऐपतीच्या प्रमाणपत्रासाठी लाचेची मागणी करणाऱ्या तहसीलदार व्यंकटेश मुंडेंना लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने ताब्यात घेतलं आहे. तहसीलदाराला एसीबीने पकडल्यामुळे बीडकरांनी चक्क फटाके फोडून एकच जल्लोष केला आहे.
ऐपतीचे प्रमाणपत्र' देण्यासाठी बीडच्या परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी पन्नास हजार रुपयाची लाचेची मागणी केली. तडजोड करत वीस हजार रुपये देण्याचं ठरलं होतं. तक्रारदाराने याबद्दल एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. याची भनक लागतात लाचेची रक्कम स्वीकारली नाहीत मात्र लाच मागितल्याचं निष्पन्न झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं. आता या प्रकरणी मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे महसूल विभागात या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
एका तक्रारदाराला आपल्या कामासाठी ऐपतीचे प्रमाणपत्र हवं होतं. हे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम २० हजार रुपये देण्याचे निश्चित झालं. मात्र, व्यवहार ठरल्यानंतर तहसीलदार मुंडे यांना तक्रारदाराच्या हालचाली आणि वर्तनावर संशय आला. संशयामुळे त्यांनी प्रत्यक्ष पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली.
advertisement
लाचेची मागणी झाली असल्याचा पुरावा मिळाल्यानंतर, एसीबीच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. लाचेची मागणी करणे हा देखील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा असल्याने, आज त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. चालू वर्षातील ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
नागरिकांनी केली फटाक्यांची आतिषबाजी
दरम्यान, बीडच्या परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच मागितल्याच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंडे यांनी 50 हजार रुपयाची लाच मागत 20 हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल केलं होतं. कारवाईचा संशय आल्यानं त्यांनी पैसे स्वीकारले नसले तरी मागितले असल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, आता या कारवाईनंतर तहसील परिसरात उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी फटाके फोडत आतिषबाजी केली.
advertisement
कनेरवाडी येथील हनुमंत फड यांनी मी गेल्या ३ वर्षांपासून माझ्या शेताच्या रस्त्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु तो झाला नव्हता, असं अधिकारी कामच करत नाहीत. परळीत अनेक ठिकाणी असाच प्रकार सुरू आहे.. पुढारी सांगतील त्याचेच काम होत आहे. हा सगळा मनमानी कारभार थांबला पाहिजे, अशी देखील अपेक्षा फड यांनी व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed: आधी 50 हजारांवर बोली नंतर 20 वर सेटलमेंट, मुंडे असा सापडला ACB च्या जाळ्यात, बीडकरांनी फटाके फोडले
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement