Tejasvi Ghosalkar On Uddhav Thackeray: 'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरमधलं राजकारण तापलं
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Tejasvi Ghosalkar On Uddhav Thackeray: दहिसरमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर असता तर त्याने पक्ष सोडला नसता असे म्हटले होते. त्यावर तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले.
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. मतदानासाठी आता काही दिवसच उरले असून आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. शिवसेना ठाकरे गट सोडल्यानंतर मातोश्री आणि ठाकरे गटावर भाष्य करणं टाळणाऱ्या भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. दहिसरमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर असता तर त्याने पक्ष सोडला नसता असे म्हटले होते. त्यावर तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले.
शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या आठवणीला उजाळा देत भाजपवर टीका केली होती. आता भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. घोसाळकर या वॉर्ड क्रमांक २ मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या उमेदवार धनश्री कोलगे यांच्या प्रचार कार्यालयाला आणि शिवसेना शाखेला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घोसाळकर कुटुंबातील फुटीवर भाष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, "आज अभिषेक असता तर घोसाळकरांचे घर फोडण्याची भाजपची हिंमत झाली नसती. मला विनोद घोसाळकरांचा अभिमान आहे. मी येथे तेजस्वी घोसाळकरांच्या विरोधात नाही, तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलो आहे. भाजपने घोसाळकरांच्या घरात भांडण लावून फोडाफोडी केली आहे.
advertisement
तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार...
एका वृत्तवाहिनीशी बोलताना तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले की, "मी आणि अभिषेकने मिळून प्रत्येक निर्णय घेतला होता. अभिषेक असता तर त्यानेही माझ्यासोबतच निर्णय घेतले असते. अभिषेक आजही माझ्यासोबतच आहेत, अशी माझी भावना आहे. उद्धव ठाकरे अभिषेकचे नाव घेऊन उगाचच प्रचार करत आहेत. तो माझा नवरा आहे, मी कोणताही निर्णय घेऊ शकते. त्यात इतरांनी ढवळाढवळ करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले. निष्ठावंत वगैरे म्हणणे आता चुकीचे आहे. राजकीय फायद्यासाठी अभिषेकच्या नावाचा वापर करणे थांबवावे असेही तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले.
advertisement
शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक १ मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. त्यांचे पती अभिषेक घोसाळकर हे देखील नगरसेवक होते. अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह सुरू असताना फेब्रुवारी २०२४ हत्या झाली होती. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. त्यांच्या जागी काही महिन्यापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांची संचालक म्हणून वर्णी लागली. त्यानंतर, मागील महिन्यातच तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 11:27 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Tejasvi Ghosalkar On Uddhav Thackeray: 'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरमधलं राजकारण तापलं








