उरले फक्त 24 तास, भाजपचा शिवसेनेला शेवटचा अल्टीमेटम, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात होणार मोठा भूकंप?

Last Updated:

भाजपनं शिवसेनेला शेवटचा अल्टीमेटम दिल्याची माहिती आहे. तोडगा काढण्यासाठी अवघा एकच दिवस दिल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

News18
News18
मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. एकत्र निवडणूक लढण्याची घोषणा झाली असली तरी या चारही महानगर पालिकांमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तरीही जागा वाटपाचं सूत्र ठरलं नाही.
ठाणे, कल्याण-डोंबिवली साठी मागील काही दिवसांपासून अगदी पहाटेपर्यंत बैठका सुरू आहेत. मात्र अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. अशात आता भाजपनं शिवसेनेला शेवटचा अल्टीमेटम दिल्याची माहिती आहे. तोडगा काढण्यासाठी अवघा एकच दिवस दिल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. आज शिवसेनेनं बैठकीचं आमंत्रण दिलं नाही तर भाजप स्वबळावर निवडणूक लढवेन आणि तशा सूचना उमेदवारांना देण्यात येतील, अशा शब्दात भाजपनं शिंदेंना सांगितल्याची माहिती आहे.
advertisement
ठाणे महानगरपालिके भाजपाने काही ठिकाणी प्रचाराला देखील सुरुवात केलीय. ठाण्यात जवळपास १६ ठिकाणी ठाणे भाजपाच्यावतीने बॅनरबाजी करण्यात आलीये. विविध केंद्रीय आणि राज्य सरकारच्या योजनांचा उल्लेख या बॅनरवर असून एक प्रकारे ठाणे भाजपाने निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकलंय. शिवसेनेकडून अजून अंतिम प्रस्ताव आला नसल्याने आणि प्रचाराकरता थोडाच वेळ उरल्याने भाजपाने स्वतंत्र प्रचार सुरू केला आहे. यामुळे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
advertisement
विशेष म्हणजे काल रात्री रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तिसरी बैठक झाली. पहाटे चार वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. या बैठकीत दोन स्थानिक नेत्यांमध्ये घमासान झाल्याची माहिती आहे. बैठकीचा हा सिलसिला सुरू असला तरी अंतिम जागावाटप अद्याप झालं नाही. १९ तारखेनंतर सेनेकडून जागावाटपाबाबत कोणताही प्रस्ताव भाजपला आला नाही. स्थानिक नेत्यांमध्ये अजूनही बैठक झाली नाही.
advertisement
ठाण्यात मोठा भाऊ म्हणून शिवसेना ८७ ते ९२ जागा लढवेन. तर लहान भाऊ म्हणून भाजप ३५ ते ४० जागा लढवेन. काही जागांवर उमेदवारांची अदलाबदली होण्याची शक्यता आहे. ⁠ठाणे महापालिकेत ३ ते ५ जागांवर युतीचं घोडं अडून आहे. तर केडीएमसीत ५ ते ७ जागांवरुन भाजपा शिवसेनेत रस्ता खेच सुरु आहे. ⁠उद्या रात्री पुन्हा युतीची बैठक होणार आहे. ही बैठक निष्पळ ठरली तर भाजप स्वबळावर मैदानात उतरू शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. ⁠या बैठकीला एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, उदय सामंत, भाजप नेते रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, नरेश म्हस्के उपस्थित होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उरले फक्त 24 तास, भाजपचा शिवसेनेला शेवटचा अल्टीमेटम, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात होणार मोठा भूकंप?
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement