New Year Mantra 2026: नवीन वर्ष सुख-संपत्ती, यश, ऐश्वर्य मिळणारं हवंय? वर्षाच्या पहिल्या दिवसासाठी 4 महामंत्र
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
New Year Mantra 2026: नवीन वर्ष 2026 सुरू व्हायला आता फक्त 4 दिवस उरले आहेत. 31 डिसेंबर 2026 रोजी घड्याळात मध्यरात्री 00:01 वाजेल आणि नववर्षाचे आगमन होईल. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवार असून गुरुप्रदोष व्रत असे दोन शुभ योग जुळून आले आहेत. वर्षाची सुरुवात शुभ योगामध्ये होत असून रात्री रवी योगही आहे. नवीन वर्षात यश, प्रगती आणि आनंद मिळावा, अशी तुमची इच्छा असेल, तर वर्षाच्या पहिल्या दिवशी काही शुभ अशा महामंत्रांचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
ॐ गं गणपतये नमो नमःगणपती बाप्पा सर्व देवांमध्ये प्रथम पूज्य असून तो विघ्नहर्ता आणि मंगलकर्ता आहे. तो यश आणि शुभता प्रदान करतो. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्नानानंतर गणपतीची पूजा करावी. त्यानंतर गणपतीच्या मनोकामनापूर्ती मंत्राचा जप करावा. या मंत्रात गणपतीचा बीजमंत्र गं देखील समाविष्ट आहे. तुम्हाला नवीन वर्षात ज्या कामात यश हवे आहे किंवा तुमची जी काही शुभ इच्छा आहे, तिच्या पूर्तीसाठी या मंत्राचा जप करा.
advertisement
ॐ नमः शिवाय -नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रदोष व्रत आहे, प्रदोषात शंकराची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी स्नानानंतर शिवपूजा करावी. सर्वप्रथम शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक करावा. चंदन, अक्षता, बेलपत्र, भांग, मदार फुले, धूप, दीप, फळे, मध इत्यादी अर्पण करून पूजा करावी. त्यानंतर रुद्राक्ष माळेने ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. हा मंत्र सर्व संकटांचे निवारण करून यश, प्रगती, सुख आणि संतती सुख देणारा आहे.
advertisement
advertisement
ॐ नमो भगवते वासुदेवाय -नवीन वर्षाचा पहिला दिवस गुरुवार आहे. गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. श्रीहरी या सृष्टीचे पालनहार असून ते सर्व जीवांचे कल्याण करणारे आहेत. जे विष्णू भक्त आहेत, त्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा पंचामृत, तुळशीची पाने, पिवळी फुले, अक्षता, धूप, दीप इत्यादींनी करावी. त्यानंतर हळद किंवा तुळशीच्या माळेने ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. हा मंत्र तुमच्या सर्व शुभ मनोकामना पूर्ण करणारा आहे.
advertisement
ॐ क्लीं कृष्णाय नमःनवीन वर्षाच्या प्रारंभी विष्णू पूजेनंतर भगवान श्रीकृष्णाच्या ॐ क्लीं कृष्णाय नमः या मंत्राचा जप करावा. हा मंत्र यश मिळवून देणारा आहे. सर्व प्रकारच्या कष्टांतून आणि संकटांतून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप करू शकता.









