Khopoli Crime : जमिनीवर खाली पाडलं, कुऱ्हाडीने वार अन्... नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या का झाली? FIR मध्ये काय म्हटलंय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Khopoli Crime Mangesh Kalokhe Murder Case : खोपोलीच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत त्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचा समावेश आहे.
Raigad Khopoli Crime : खोपोली नगरपालिकेतील शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडल्याचं समोर आलं. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. मंगेश काळोखे असं पतीचं नाव असून या प्रकरणात आता 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचं देखील नाव आहे. खोपोली पोलिसात सर्वजणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुनाचा कट कुणी रचला?
खोपोलीच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत त्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ते भरत भगत, रविंद्र देवकर, धनेश देवकर, दर्शन देवकर, सचिन चव्हाण, रवींद्र देवकर यांचा बाऊंसर आणि इतर तीन अनोळखी इसम यांच्यावर खोपोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर घारे, भरत भगत आणि रवींद्र यांनी खुनाचा कट रचला असल्याचे FIR मध्ये स्पष्ट म्हटलं आहे.
advertisement
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
आरोपी दर्शन देवकर आणि सचिन चव्हाण यांनी मंगेश यांना पाठलाग करून खाली पाडले आणि इतर तीन जणांनी तलवार, कोयता आणि कुऱ्हाड यांनी वार करून मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली. या हत्येचे कारण फिर्यादी म्हटल्याप्रमाणे निवडणुकीत झालेला पराभव, राजकीय वाद, आणि पूर्व वैमनस्य असं आहे. जे या आरोपींच्या विरोधात जे कलम लावण्यात आले आहेत. त्यामध्ये सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. रात्री उशिरा मंगेश काळोखे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
advertisement
नेमकं काय घडलं?
दरम्यान, आरोपीत यांनी खोपोली नगरपरिषद निवडणुकीत पराभव झाल्याने, राजकीय वादातून व पूर्व वैमनस्यातून फिर्यादीचे चुलते तथा मयत हे त्यांच्या मुलींना शिशुमंदिर स्कूल, खोपोली येथे सोडण्यासाठी गेले होते, मुलींना शिशुमंदिर स्कूल येथे सोडून परत येत असताना सकाळी 7 वाजताच्या सुमारास जया बार समोरील चौकात, विहारी, खोपोली येथे आले वेळी आरोपीत क्रं 2,4 व इतर 3 इसम यांनी मयत मंगेश काळोखे उर्फ आप्पा यांचा पाठलाग करून त्यांना जमिनीवर खाली पाडले व त्यांच्यावर तलवार, कोयता व कु-हाडीने वार करून जिवे ठार मारले, असं FIR मध्ये लिहिण्यात आलंय.
view commentsLocation :
Raigad,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 8:16 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Khopoli Crime : जमिनीवर खाली पाडलं, कुऱ्हाडीने वार अन्... नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या का झाली? FIR मध्ये काय म्हटलंय?









