BREAKING: अजित पवार अचानक 'नॉट रिचेबल', पोलीस ताफा सोडून एकटेच निघून गेले, राजकारणात खळबळ!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून अजित पवार कोणालाही काहीही न सांगता, कोणताही सरकारी ताफा किंवा पोलीस संरक्षण न घेता अचानक रवाना झाले आहेत.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांनाच चक्रावून सोडलं आहे. पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून अजित पवार कोणालाही काहीही न सांगता, कोणताही सरकारी ताफा किंवा पोलीस संरक्षण न घेता अचानक रवाना झाले आहेत. त्यामुळे अजित पवार नेमकं कुठे गेले? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे.
नेमका प्रकार काय?
मागील काही दिवसांपासून अजित पवार हे पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये काही नियोजित बैठकांसाठी उपस्थित होते. मात्र, इथून ते अचानक बाहेर पडले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांच्यासोबत नेहमी असणारा पोलिसांचा फौजफाटा, पायलट कार आणि सुरक्षारक्षक यांचा ताफा तिथेच उभा राहिला. अजित पवार एकटेच तिथून निघून गेले आहेत.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. दोन्ही राष्ट्रवादीत जागा वाटपाचं सूत्र देखील ठरलं होतं. मात्र ऐनवेळी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, यावरून ही चर्चा फिसकटल्याची माहिती आहेत. ही चर्चा फिसकटल्यानंतर अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडले आहेत.
advertisement
एकीकडे, शरद पवार गटाशी चर्चा फिसकटल्यानंतर अचानक अशाप्रकारे अजित पवार नॉट रिचेबल झाल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. ते कौटुंबीक कारणासाठी तिथून बाहेर पडले की यामागे काही राजकीय कारण आहे? याबाबत आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 8:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BREAKING: अजित पवार अचानक 'नॉट रिचेबल', पोलीस ताफा सोडून एकटेच निघून गेले, राजकारणात खळबळ!









