डोंबिवलीत मिळतं घरगुती अन् चविष्ट आगरी कोळी जेवण, 55 वर्षांचे काका याठिकाणी लावतात स्टॉल

Last Updated:

homemade agri koli food stall - धनाजी चौधरी यांचा हा स्टॉल आहे. गरिबीमुळे काहीजण खचतात तर काहीजण जोमाने पुढे जातात. धनाजी चौधरी यांनीही गरिबीवर मात करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. शिक्षण घेतले नसल्यामुळे व्यवसाय करावा, असे त्यांच्या मनात आले आणि त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.

+
डोंबिवलीत

डोंबिवलीत मिळतं घरगुती अन् चविष्ट आगरी कोळी जेवण

साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे - मुंबई, ठाणे परिसरात बाहेरुन आलेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अनेकजण घरगुती जेवणाच्या शोधात असतात. घरगुती जेवण जिथे मिळेल तिथे सगळ्यांचीच गर्दी होते. त्यात जर ते जेवण आगरी कोळी पद्धतीच असेल तर लोकांचा खूपच प्रतिसाद मिळतो. आज आपण डोंबिवलीतील अशाच एका आगरी कोळी घरगुती जेवणाचा स्टॉलबाबत जाणून घेणार आहोत.
advertisement
धनाजी चौधरी यांचा हा स्टॉल आहे. गरिबीमुळे काहीजण खचतात तर काहीजण जोमाने पुढे जातात. धनाजी चौधरी यांनीही गरिबीवर मात करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. शिक्षण घेतले नसल्यामुळे व्यवसाय करावा, असे त्यांच्या मनात आले आणि त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.
धनाजी चौधरी हे दिवसाला चिकन, मटण, भाकरी, कोळंबी याचा व्यवसाय करून फक्त 2 तासात हजार ते 2 हजार रुपये कमावतात. डोंबिवलीस्टेशन पासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या फडके रोडवर ते त्यांचा स्टॉल लावतात. याठिकाणी ते घरगुती आगरी कोळी जेवण विकतात. यामध्ये मटण रस्सा, मटन सुक्का, मटन खिमा, चिकन रस्सा, कलेजी मसाला, कोळंबी रस्सा, सुकी मच्छी, तांदळाची भाकरी, चपाती हे सगळे पदार्थ मिळतात. यांची किंमत फक्त 100 रुपयांपासून सुरू होते. या सगळ्या पदार्थांसोबतच ते आगरी मसाला सुद्धा विकतात.
advertisement
एकेकाळी होता हॉटेल कामगार, आज झाला हॉटेल मालक, दिवसाला 2 हजारांचा नफा, जालन्यातील व्यक्तीच्या जिद्दीची कहाणी!
'माझ्या येथे मिळणारे सगळे पदार्थ हे घरगुती असतात, हे सगळे पदार्थ मी स्वतः बनवतो. माझे शिक्षण झाले नसल्यामुळे व्यवसाय हा एकच उद्देश माझ्यासमोर होता. म्हणूनच मी हा स्टॉल लावायला लागलो. आता माझे रोजचे गिऱ्हाईक माझ्याकडे नेहमी चिकन मटण घ्यायला येतात. यातच माझे यश आहे,' अशा शब्दात धनाजी चौधरी यांनी आपल्या भावना लोकल18 सोबत बोलताना व्यक्त केल्या.
advertisement
तर मग तुम्हालाही घरगुती पद्धतीचे चिकन, मटण खायचे असेल तर तुम्ही याठिकाणी स्वस्तात मस्त असे चविष्ट पदार्थ खाण्यासाठी नक्की भेट देऊ शकतात.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
डोंबिवलीत मिळतं घरगुती अन् चविष्ट आगरी कोळी जेवण, 55 वर्षांचे काका याठिकाणी लावतात स्टॉल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement