‘गोविंदा रे गोपाळा…’ शाळेच्या विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; चिमुरडी बनली कृष्ण Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
डोंबिवलीतील या शाळेमध्येही दहीहंडी फोडून गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली.
डोंबिवली, 7 सप्टेंबर : प्रत्येक शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. प्रत्येक शाळा आपल्या विद्यार्थ्यांसाठी आठवणींचा कप्पा असते. शाळेतून बाहेर पडल्यानंतर देखील आमच्या शाळेत आम्ही असा सण साजरा करत असे अशी एक आठवण हमखास सांगितली जाते. त्यासाठीच डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. आज सर्वत्रच गोकुळाष्टमी साजरी करण्यात येत असून डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेत देखील चिमुरड्यांसह मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी दहीहंडी फोडून गोकुळाष्टमी साजरी केली.
चिमुरडी बनली कृष्ण
यावेळी छोट्या चिमुरडीने कृष्णाचा वेष परिधान केला होता. यावेळी छोट्या वर्गातील मुलांसह मोठ्या वर्गातील विद्यार्थी देखील या सगळ्या उत्सवात सहभागी झाले होते. तर मोठ्या विद्यार्थ्यांची दही हंडी देखील साजरी झाली.
मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद कृष्णालाही हवाहवासा
मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद कृष्णालाही हवा हवासा वाटेल असाच होता. गोविंदाच्या गाण्यावर लहान मुलांची पाऊले थिरकलेली पाहिला मिळाली. यावेळी शाळेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी देखील पाणी फवारून मुलांचा आनंद द्विगुणित केला.
advertisement
चोर दहीहंडी का साजरी करतात, काय आहे यामागील परंपरा?
view commentsया शाळेत विविध उपक्रम आणि सणवार साजरे केले जातात. आम्ही कोणत्याही सणांना मुलांना सुट्टी देत नाही. त्याऐवजी आम्ही मुलांना सणाचा मुख्य हेतू त्यामागची कथा , त्यामागची संस्कृती समजून देण्याचा प्रयत्न करतो आणि सणांचा आनंद शाळेत सर्वजण एकत्र साजरा करतो अशी माहिती विवेक पंडीत यांनी दिली. यावेळी मोठ्या मुलांसाठी एक हंडी आणि छोट्या मुलांसाठी एक हंडी अशा दोन हंड्या फोडण्यात आल्या.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 07, 2023 4:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
‘गोविंदा रे गोपाळा…’ शाळेच्या विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; चिमुरडी बनली कृष्ण Video

