advertisement

girls self defence tips : मुलींनो आता तुमच्या बॅगमध्ये ठेवा या वस्तू, सेल्फ डिफेन्सबाबत महत्त्वाची माहिती

Last Updated:

मुलींनो आता घराबाहेर पडताना तुमच्या बॅगमध्ये सेल्फ डिफेन्ससाठी कोणत्या गोष्टी ठेवू शकतात, याबाबत जाणून घेऊयात.

+
प्रतिकात्मक

प्रतिकात्मक फोटो

साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : कोलकाता येथील बलात्कार प्रकरणानंतर देशात संतापाची लाट आहे. असे असताना आता बदलापूरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्यामुळे आता सध्याची परिस्थिती पाहता मुलींना आता सगळीकडे असुरक्षित वाटायला लागले आहे, अशी भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे मुलींनो आता घराबाहेर पडताना तुम्हालाही भीती वाटत असेल आणि स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबद्दल प्रश्न पडला असेल तर ही बातम्यासाठी तुमच्यासाठीच आहे.
advertisement
मुलींनो आता घराबाहेर पडताना तुमच्या बॅगमध्ये सेल्फ डिफेन्ससाठी कोणत्या गोष्टी ठेवू शकतात, याबाबत जाणून घेऊयात.
पेपर स्प्रे - पेपर स्प्रे किंवा चिली स्प्रे हे तुमच्या बॅगमध्ये नक्की ठेवा. क्विक ऍक्शन घेतल्यानंतर हे तुम्ही समोरच्याच्या डोळ्यावर स्प्रे करू शकता.
मिरची पूड - घरातील मिरची पूडसुद्धा तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवू शकता. इमर्जन्सीच्या वेळी हे तुमच्या खूप उपयोगी पडेल.
advertisement
कि चेन - हे असे चेन आहे, यामुळे आजूबाजूच्या लोकांचे लक्ष तुमच्याकडे जाईल आणि ते लोक तुमच्या मदतीसाठी येऊ शकतील.
मिनी नाइफ - मिनी नाईफ हे तुम्हाला पेनासारख दिसेल. परंतु यात आत चाकू असतो. तुमच्यावर अचानक वाईट परिस्थिती ओढवली तर तुम्ही याचा वापर करून स्वतःचा बचाव करू शकता.
advertisement
लेझर टॉर्च - या लेझर टॉर्चचा वापर करून तुम्ही समोरच्याच्या डोळ्यांवर मारू शकता. यामुळे काही वेळासाठी समोरच्याच्या डोळ्यांवर अंधारी येऊ शकते.
'मिरची पूड, पेपर स्प्रे, छोटा चाकू या गोष्टी मुलींनी आता बॅगमध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे. सध्या संपूर्ण भारतातच भयावह परिस्थिती आहे. त्यामुळे शक्यतो एकटे असल्यास या सगळ्या गोष्टी बाहेर सोबत घेऊनच जा. मुलींना कराटे किंवा बॉक्सिंग यासारख्या गोष्टीसुद्धा आल्या पाहिजेत, जेणेकरून अचानक काही समस्या उद्भवली तर त्यांचा सामना मुलींना करता यायला हवा,' असे मुंबईतील रुईया कॉलेजच्या एनएसएस प्रोग्राम ऑफिसर अंजली लादे यांनी सांगितले.
advertisement
मुलींनो आता घाबरू नका. अचानक संकट आलं आणि जवळ मोबाइल असेल तर 100 किंवा 103 या नंबर वर संपर्क करा. पोलीस लगेचच तुमच्या मदतीसाठी येतील. सतर्क रहा आणि काळजी घ्या.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
girls self defence tips : मुलींनो आता तुमच्या बॅगमध्ये ठेवा या वस्तू, सेल्फ डिफेन्सबाबत महत्त्वाची माहिती
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement