लोकलच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 4 जलद गाड्यांना कळवा आणि मुंब्रा मिळाला थांबा, काय असेल नेमकी वेळ?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
news for local train passengers - कळवा आणि मुंब्रा येथून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने प्रामुख्याने आता सकाळी आणि सायंकाळी या गर्दीच्या वेळेत 4 जलद गाडयांना थांबा देण्यात आला आहे. यामुळे कळवा आणि मुंब्रा येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे - कळवा-मुंब्रा या रेल्वे स्थानकातून नियमित स्वरूपात आपल्या कामानिमित्त मुंबई येथे जाणाऱ्या लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्यावेळी धावणाऱ्या 4 जलद लोकल गाडयांना मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने कळवा आणि मुंब्रा या स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाच्या नवीन वेळापत्रकाप्रमाणे 5 ऑक्टोबर 2024 पासून या गाडयांना थांबा देण्यात येणार आहे. दिवा शिवसेना उपशहरप्रमुख आणि दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती.
advertisement
या मागणीला खासदार डॉ. शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मध्य रेल्वे प्रशासनाकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना आता यश आले असून 4 लोकल गाड्यांना कळवा आणि मुंब्रा येथे थांबा देण्यात आला आहे.
कळवा ते अंबरनाथ या रेल्वे स्थानकातून नियमित स्वरूपात रोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. येथील प्रवाशांची किमान रेल्वे स्थानकांमध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे स्थानकांमध्ये होम फलाटांची उभारणी करणे, फलाटांची उंची आणि रुंदी वाढविणे, अधिकच्या लोकलसेवा सुरू करणे यांसह रेल्वे स्थानकांमध्ये विविध मूलभूत सुविधा उभारल्या आहेत.
advertisement
तर कळवा आणि मुंब्रा या दुर्लक्षित रेल्वे स्थानकांकडे जातीने लक्ष देऊन खासदार डॉ. शिंदे यांनी दोन्ही रेल्वे स्थानकांमध्ये पायाभूत सुविधा उभारणीसह फलाटांची रुंदी वाढविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. यामुळे सद्यस्थितीत दोन्ही रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत.
कळवा आणि मुंब्रा येथून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने प्रामुख्याने आता सकाळी आणि सायंकाळी या गर्दीच्या वेळेत 4 जलद गाडयांना थांबा देण्यात आला आहे. यामुळे कळवा आणि मुंब्रा येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
या गाडयांना थांबा -
- अंबरनाथहुन-मुंबईच्या दिशेने जाणारी जलद लोकल कळवा रेल्वे स्थानकात सकाळी 8.56 वाजता थांबेल.
- आसनगावहुन-मुंबईच्या दिशेने जाणारी जलद लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकात सकाळी 9.23 वाजता थांबेल.
- मुंबईहून बदलापूरच्या दिशेने जाणारी जलद लोकल कळवा रेल्वे स्थानकात सायंकाळी 7.29 वाजता थांबेल.
- मुंबईहून टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी जलद लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकात सायंकाळी 7.47 वाजता थांबेल.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
October 03, 2024 7:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
लोकलच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 4 जलद गाड्यांना कळवा आणि मुंब्रा मिळाला थांबा, काय असेल नेमकी वेळ?


