नाका कामगारांचं टेन्शन होणार दूर, ‘या’ पद्धतीनं घेता येईल सरकारी योजनांचा फायदा

Last Updated:

नाका कामगारांसाठी अनेक सरकारी योजना आहेत. त्यांचा लाभ कसा घ्यायचा याची माहिती त्यांना नसते.

+
News18

News18

डोंबिवली, 2 ऑगस्ट : समाजातील नेहमी दुर्लक्षित राहणारा घटक म्हणजे नाका कामगार. या कामगारांसाठी सरकारनं वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात अनेक नाका कामगारांना माहिती नसते. त्यामुळे ते त्यापासून वंचित राहतात. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करावी? त्यासाठी कोणते कागदपत्रं लागतात या संदर्भात  महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे संस्थापक लक्ष्मण मिसाळ यांनी माहिती दिली आहे.
'ही' कागदपत्रं आवश्यक
नाका कामगारांना योजनांचा लाभ घेण्यासाठी   रेशन कार्ड , आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे खाते असणे आवश्यक आहे. रेशन कार्डवर  पत्नी आणि मुलांची नावे असतील तर त्यांना सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येतो. त्याचबरोबर सरकारी रक्कम थेट बँकेच्या खात्यात जमा होण्यासाठी बँक अकाऊंट असणे गरजेचं आहे. ज्या हद्दीत काम करतो तेथील अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यापैकी ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता त्या अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र आवश्यक आहे, अशी माहिती मिसाळ यांनी दिली.
advertisement
कसा भरणार अर्ज?
आवश्यक प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सरकारी संकेतस्थावर उपलब्ध असलेल्या अर्जासह ते सादर करायचे आहेत. हा अर्ज कामगार कार्यालयात जमा होईल. त्यानंतर या कामगारांना सरकारकडून कार्ड देण्यात येतं. हे कार्ड म्हणजे नोंदणीकृत नाका कामगार असल्याचा पुरावा आहे. या कार्डच्या माध्यमातून 30 सरकारी योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकता, असं मिसाळ यांनी स्पष्ट केलं.
advertisement
'ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचा अर्ज आणि नोंदणीकृत सभासद असल्याचे कार्ड सादर केल्यानंतर योजनेनुसार कागदपत्रे देणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ एखाद्या नाका कामगाराच्या पत्नीला गरोदरपणात काही खर्च आला असेल तर नाका कामगाराचे रेशन कार्ड , पॅन कार्ड, आधार कार्ड याशिवाय पत्नीचे आधार कार्ड रेशन कार्ड आणि बाळाचा जन्म दाखला आदी कागदपत्र सादर केल्यानंतर त्या योजनेचा फायदा त्यांना मिळतो,' अशी माहिती मिसाळ यांनी दिली.
advertisement
कल्याण डोंबिवलीतल्या दोन नाका कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी 51 हजार या योजनेतून सरकारकडून देण्यात आले. संपूर्ण कागदपत्रं सादर केल्यानंतर हे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले, असं मिसाळ यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
नाका कामगारांचं टेन्शन होणार दूर, ‘या’ पद्धतीनं घेता येईल सरकारी योजनांचा फायदा
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement