चौकीदारच निघाला चोर! रातोरात फोडली 14 दुकानं, ठाणे आणि मुंबईतील धक्कादायक घटना

Last Updated:

Thane Robbery Case: ठाण्यात एकाच रात्रीत 14 दुकानांचे शटर उचकटून चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी चौकीदारच चोर असल्याचे पुढे आले आहे.

Thane Crime News: चौकीदारच निघाला चोर! रातोरात फोडली 14 दुकानं, ठाणे आणि मुंबईतील धक्कादायक घटना
Thane Crime News: चौकीदारच निघाला चोर! रातोरात फोडली 14 दुकानं, ठाणे आणि मुंबईतील धक्कादायक घटना
ठाणे: एकाच रात्रीत 14 दुकानांचे शटर उचकटून चोरी झाल्याची घटना ठाण्यातील नौपाडा येथे नुकतीच घडली होती. या प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची चक्रे फिरवली आणि 2 अट्टल चोरट्यांना अटक केलीये. महंत कामी (वय 23) आणि विष्णू कामी (36) अशी नेपाळी चोरट्यांची नावे असून ते दिवसा सुरक्षा रक्षक तर रात्री चोरी करत होते. चौकशीत ठाणे, मुंबई परिसरातील 9 गुन्ह्यांची उकल झाली असून त्यांच्याकडून मोबाईलसह सुमारे 2 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
चौकीदारच निघाले चोर
ठाण्यातील नौपाड्यामध्ये 12 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास एकाच रात्रीमध्ये सलग 14 दुकानांमध्ये चोरी झाली होती. याप्ररणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या चोऱ्यांचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला होता. घटनास्थळी मिळालेल्या 90 ते 100 सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी पोलिसांनी केली. तेव्हा चोरी केल्यानंतर चोरटे वेगवेगळ्या मार्गाने निघून गेल्याचे दिसले.
advertisement
चोरी करणारे दोघेही नेपाळी
चोरी करणारे दोघे  दोन नेपाळी सुरक्षारक्षक आहेत हे निष्पन्न झाले. त्यांची नावे महंत कामी आणि विष्णू कामी अशी आहेत. महंत मीरारोड तर विष्णू उल्हासनगर भागात सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. दोघेही दिवसा सुरक्षारक्षक म्हणून काम करायचे आणि रात्री चोऱ्या करीत होते. विष्णू विरोधात मीरा भाईंदरमध्ये एक गुन्हा यापूर्वी दाखल झाला आहे.
advertisement
अशी करायचे चोरी
सीसीटीव्ही फुटेजवरून विष्णू आणि महंत यांची चोरी करण्याची पद्धत पुढे आली आहे. महंत हा मार्केट परिसरातील बंद दुकानांचे शटर उचकटून चोरी करायचा. तर विष्णू हा लांब उभा राहून रेकी करीत असल्याचे दिसून आले. या दोघांनीही ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरात 9 चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. 9 पैकी चार गुन्हे दोघांनी तर उर्वरित पाच हे महंत याने साथीदारांच्या मदतीने केले असल्याचे उघड झाले.
advertisement
27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
रिक्षा चालक, हॉटेल व्यावसायिक यांच्याकडील चौकशीत महंत आणि विष्णू या दोघांनाही 20 मार्च रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अटक केली. त्यांना ठाणे न्यायालयाने 27 मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली. उपनिरीक्षक दीपक घुगे यांच्या पथकाने या चोरट्यांकडून साहित्य जप्त केले. त्याचबरोबर 2 लाख 60 हजारांचा मुद्देमाल सुद्धा हस्तगत केला आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
चौकीदारच निघाला चोर! रातोरात फोडली 14 दुकानं, ठाणे आणि मुंबईतील धक्कादायक घटना
Next Article
advertisement
Vinod Ghosalkar On Tejasvee Ghosalkar: तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांगितलं...
तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग
  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

View All
advertisement