Tourist Places in Thane: मस्त पाऊस, सगळीकडे हिरवाई, पावसाळ्यात ठाण्यातील ही ठिकाणं तुम्हाला माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
ठाण्यातील गायमुख चौपाटी हे ठिकाण नक्कीच बघण्यासारखं आहे. शहरापासून थोडंसं दूर असलेली ही चौपाटी अजूनही गर्दीपासून लांब आहे, त्यामुळे इथे निवांत वेळ घालवता येतो.
मुंबई : सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. अशा वेळी निसर्गाची मजा घ्यायची असेल आणि आपल्या कुटुंबासोबत एखाद्या शांत जागी फिरायला जायचं असेल, तर ठाण्यातील गायमुख चौपाटी हे ठिकाण नक्कीच बघण्यासारखं आहे. शहरापासून थोडंसं दूर असलेली ही चौपाटी अजूनही गर्दीपासून लांब आहे, त्यामुळे इथे निवांत वेळ घालवता येतो.
गायमुख चौपाटीचं खास वैशिष्ट्य म्हणजे येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा. हा पुतळा चौपाटीच्या प्रवेशद्वाराजवळ आहे आणि वेळोवेळी स्थानिक लोक त्यावर फुले अर्पण करतात, त्यामुळे या ठिकाणी एक आदरभाव आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण होतं. पर्यटक आणि स्थानिक दोघेही इथे दर्शनासाठी थांबतात.
advertisement
गायमुख चौपाटीचं वातावरण पावसात अगदी सुंदर दिसतं. आकाशात काळे ढग, समुद्राच्या लाटा, आणि सभोवताली पसरलेली हिरवाई हे सगळं एकदम मनाला शांत करणारा अनुभव देतं. इथे मोकळ्या जागा आहेत जिथे लहान मुलांना खेळायला जागा मिळते, झाडाखाली बसून गप्पा मारता येतात आणि फोटोसुद्धा छान येतात.
advertisement
या ठिकाणी बोटिंगचीही सुविधा आहे. कुटुंबासोबत तुम्ही छोट्या बोटीत बसून पाण्यावर फिरू शकता. हे बोटिंग मुलांसाठी वेगळाच अनुभव असतो. पावसात थोडं थांबून बोटीतून निसर्ग पाहणं ही एक छोटी सहलच वाटते. चौपाटीवर खाण्यापिण्याचे थोडेफार स्टॉल्स असतात, पण मोठ्या प्रमाणात काही सुविधा नाहीत. त्यामुळे जेवणाचे सामान किंवा पाण्याच्या बाटल्या स्वतःसोबत न्यायल्या हरकत नाही. तसंच, कचरा न करता परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी.
advertisement
कशी पोहोचाल?
गायमुख चौपाटी ठाण्याच्या घोडबंदर रोडजवळ आहे. खासगी वाहनाने किंवा कॅबने सहज जाता येतं. काही लोक बस किंवा रिक्षानेही जातात. रस्त्याच्या शेवटी थोडंसं चालावं लागतं.
जर तुम्ही ठाण्यात राहत असाल आणि पावसात कुठेतरी निवांत फिरायला जायचा विचार करत असाल, तर गायमुख चौपाटी एक छान पर्याय आहे. निसर्ग, शांतता आणि मुलांसाठी थोडी मजा हे सगळं एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 24, 2025 10:03 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Tourist Places in Thane: मस्त पाऊस, सगळीकडे हिरवाई, पावसाळ्यात ठाण्यातील ही ठिकाणं तुम्हाला माहितीये का?