एकीकडे नोकरी तर दुसरीकडे स्वतःची डान्स अकॅडमी, तरुणीनं केली अडचणींवर मात, अशाप्रकारे जोपासली आपली आवड
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
ऑफिस सांभाळून स्वतःची कला जपणं हे खरंतर अत्यंत अवघड काम आहे. पण निकिता कोणत्याही त्रासाची परवा न करता तिला आवडणारी कला जोपासते.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : करिअर करताना आपली कला जपणं ही तारेवरची कसरत असते. अनेकांना हे शक्य होत नाही. पण ऐरोलीच्या निकिता अवारी हिने मात्र हे शक्य करून दाखवल आहे. निकिता गेले अनेक वर्ष डान्स, कथक शिकते आहे. तिचे शिक्षण मास मीडिया म्हणून झालेले असून ती सकाळी दहा ते संध्याकाळी 5 पर्यंत ऑफिसला जाते आणि त्यानंतर स्वतःच्या डान्स अकॅडमीमध्ये संध्याकाळी शिकवायला सुद्धा येते.
advertisement
ऑफिस सांभाळून स्वतःची कला जपणं हे खरंतर अत्यंत अवघड काम आहे. पण निकिता कोणत्याही त्रासाची परवा न करता तिला आवडणारी कला जोपासते. निकिताने एका वर्षापूर्वीच स्वतःची इरावा डान्स अँड फिटनेस अकॅडमी सुरू केली. सध्या निकिताच्या अकॅडमीमध्ये अनेक लहान मुलांसोबतच 80 ते 90 जण आहेत. ती अकॅडमी मध्ये हीप हॉप, बॉलीवुड, सेमी क्लासिकल, कथ्थक, फ्रीस्टाइल, फॉक हे सगळे नृत्य प्रकार शिकवते.
advertisement
'सुरुवातीला मला दोन्ही गोष्टी सांभाळणं कठीण जात होतं. परंतु जिद्दीने आणि मेहनतीने मी ही अकॅडमी चालवत आहे. पूर्वी माझ्याकडे फक्त 30 ते 40 जण शिकत होते. पण आता त्यांची संख्या वाढली आहे. माझ्या क्लायंटसनी आणि आई-वडिलांनी मला माझ्या पूर्ण प्रवासात खूप साथ दिली आहे. ज्यांना मनापासून स्वतःची कला जोपासायची आहे ते कोणत्याही परिस्थितीत ती जोपासू शकतात,' असे निकिता आवारी हिने सांगितले.
advertisement
शाळेवर अतिक्रमण करत थाटला संसार! विद्यार्थ्यांवर आली उघड्यावर शिकण्याची वेळ, जालन्यातील धक्कादायक वास्तव…
view commentsनिकिता ही वेलकम टू वरली या इंजीनियरिंग कंपनीत नोकरी करते. तसेच ऐरोली, सेक्टर 8, नवी मुंबई याठिकाणी आपली डान्स अकॅडमी चालवते. तुमच्यापैकी जर कोणाला करिअर सोबत तुमच्यात असलेल्या कलेला सुद्धा न्याय द्यायचा असेल, त्यातच काहीतरी नवीन सुरू करावं, असा विचार असेल तर तुमच्यासाठी निकिता अवारी ही एक उत्तम आदर्श ठरेल.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
July 10, 2024 2:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
एकीकडे नोकरी तर दुसरीकडे स्वतःची डान्स अकॅडमी, तरुणीनं केली अडचणींवर मात, अशाप्रकारे जोपासली आपली आवड

