advertisement

ड्रग्स प्रकरणानंतर तुळजापूरमध्ये मोठी कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त, काँग्रेस नेता गळाला

Last Updated:

Dharashiv News: ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद गंगणेसह ड्रग्स प्रकरणात कारवाईची मागणी करणारे काँग्रेसचे अमोल कुथवळ हेच मटका अड्डा प्रकरणाचे मुख्य आरोपी निघाले.

धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई
धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई
धाराशिव: ड्रग्स प्रकरणानंतर आता तुळजापूरमध्ये मटका बुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून तुळजापुरात अवैधरित्या चालणाऱ्या मटका अड्डयावर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्वतः जाऊन छापा मारत ही कारवाई केली आहे. ३३ जणांवर गुन्हा दाखल करत लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी लॉजवर असल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार कारवाईसाठी मोठा फौज फाटा घेऊन पोलीस गेले होते. मात्र तिथे ड्रग्स प्रकरणातील आरोपी नसून मटका बुकिंग व्यवसाय चालत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्या हॉटेलचे दरवाजे तोडून ही कार्यवाही केली आहे.
यात ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद गंगणेसह ड्रग्स प्रकरणात कारवाईची मागणी करणारे काँग्रेसचे अमोल कुथवळ, सचिन पाटील हे मटका बुकीचे मालक असल्याचे निष्पन्न झाले असून काँगेस पक्षाचे नेते अमोल कुतवळ, सचिन पाटील यांच्यासह अनेक बडे मासे गळाला लागले आहेत.
advertisement
या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह मोबाईल, लॅपटॉप, प्रिंटर असा एकूण १ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ३३ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून अवैध धंद्यांविरोधात पोलिसांच्या कठोर भूमिकेचे दर्शन घडले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ड्रग्स प्रकरणानंतर तुळजापूरमध्ये मोठी कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त, काँग्रेस नेता गळाला
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement