Uddhav Thackeray BMC : BMC निवडणूक प्रभाग रचनेचे आदेश, ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, 12 शिलेदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गट अॅक्शन मोडवर आला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास 12 शिलेदारांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
मुंबई: मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले आहे. राज्य सरकारने महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे आदेश जारी केले आहेत. या महापालिका निवडणुकीत 2017 च्या रचनेप्रमाणे प्रभाग असणार असल्याची माहिती आहे. तर, मुंबई वगळता इतर महापालिका या चार सदस्यीय प्रभाग असणार आहेत. मुंबई महापालिकेत एक प्रभाग असणार असून शिवसेना ठाकरे गट अॅक्शन मोडवर आला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास 12 शिलेदारांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आता मुंबईसह इतर महापालिकेची निवडणूक होणार आहे. शिवसेना ठाकरे गटासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. ठाकरे गटासाठी मुंबई महापालिका निवडणूक नवसंजीवनी देणारी असेल. तर, दुसरीकडे भाजप-शिंदे गटाकडून ठाकरे गटावर अखरेचा घाव घालण्यासाठी प्रयत्न सुरू असून मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
advertisement
उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षाच्या राजकीय अस्तित्वाची ही निवडणूक असणार आहे. त्यामुळे उद्धव यांनी मुंबई महापालिकेची निवडणुकीसाठी मोठी तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपल्या उपनेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. या उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदारी असणार आहे. या 12 शिलेदारांवर प्रत्येकी 3 विधानसभा मतदारसंघातील महापालिका वॉर्डची जबाबदारी असणार आहे.
advertisement
>> ठाकरेंच्या कोणत्या शिलेदारांवर कोणती जबाबदारी?
> अमोल कीर्तीकर - दहिसर, बोरिवली, मागाठाणे
> उद्धव कदम - चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम
> विलास पोतनीस - दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व
> विश्वासराव नेरूरकर - वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम
> रवींद्र मिर्लेकर - विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम
> गुरुनाथ खोत -, चांदिवली, कलीना, कुर्ला
advertisement
> नितीन नांदगावकर * विक्रोळी, भांडुप, मुलुंड
> सुबोध आचार्य - घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर - मानखुर्द
> मनोज जमसूतकर - अनुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा
> अरुण दूधवडकर - धारावी, माहीम, वडाळा
> अशोक धात्रक - वरळी, दादर, शिवडी
> सचिन अहिर - मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी
शिवसेना ठाकरे गटाचे हे उपनेते मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील. त्याशिवाय, स्थानिक पातळीवर असलेल्या राजकीय स्थितीबाबत, पक्ष-संघटनेची स्थिती आदी विविध मुद्यांवर पक्षप्रमुखांना अहवाल सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
राज्य सरकारने महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी नव्या प्रभाग रचनेचे आदेश जाहीर केले आहेत. या आदेशानुसार 'अ', 'ब' आणि 'क' श्रेणीतील महापालिकांमध्ये प्रभागांची नवीन रचना करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांचा समावेश आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 11, 2025 12:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray BMC : BMC निवडणूक प्रभाग रचनेचे आदेश, ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, 12 शिलेदारांवर सोपवली मोठी जबाबदारी