Vaishnavi Hagawane Case : आज दिघे साहेब असते तर...? कस्पटे कुटुंबीयांचा एकनाथ शिंदेना थेट सवाल
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे कस्पटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वैष्णवी हगवणे यांच्या आई वडील आणि समस्त कस्पटे कुटूंबियांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या हगवणे कुटुंबावर कठोर कारवाईची मागणी राज्यातून होत आहे. वैष्णवीने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे कस्पटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वैष्णवी हगवणे यांच्या आई वडील आणि समस्त कस्पटे कुटूंबियांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र, यावेळी एकनाथ शिंदे यांना कुटुंबातील सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
हुंडाबळीच्या या प्रकरणात हुंड्याचा मोह आणि त्यातून येणाऱ्या खोट्या प्रतिष्ठेपायी मुलीप्रमाणे असलेल्या सुनेला मारहाण करून तिला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या हगवणे कुटुंबातील सर्व पाच सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
कस्पटेंचा कुटुंबीयांचा संताप...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी घरातील महिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट सवाल केला. या घरातील महिलांनी म्हटले की, आज जर आनंद दिघे साहेबर असते आणि असा प्रकार घडला असता तर त्यांनी काय केले असते, असा रोखठोक प्रश्न त्यांनी केला. महिलांच्या या प्रश्नांवर एकनाथ शिंदे हे काही काळ निरुत्तर झाले होते.
advertisement
आरोपींवर कठोर कारवाई होणार...
दरम्यान, कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आरोपींना कठोरात कठोर शासन केले जाईल असे शिंदे यांनी सांगितले. तसेच त्यांना मदत करणारे, किंवा त्यांच्या आडून समाजात दहशत माजवणारे, अथवा त्यांचे गुन्हे पाठीशी घालण्यासाठी मदत करणारे कितीही मोठे असले तरीही त्यांची गय केली जाणार नाही असेही स्पष्ट केले. पोटाची मुलगी जाण्याचे दुःख पचवणे हे खरोखरच फार अवघड असते, मात्र तरीही या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांना केले.
advertisement
या प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचे तपशील शिंदे यांनी कस्पटे कुटूंबियांकडून जाणून घेतले. तसेच या प्रकरणी लागेल ती सर्व मदत करण्याबाबत आश्वासन केले. यावेळी त्यांनी वैष्णवीचे बाळ आपल्या हातात घेऊन ज्यांनी एवढ्या लहान वयात या मुलाला मायेपासून पारखे केले त्याना नक्की शासन करून या बाळाला न्याय मिळवून देऊ असा विश्वास व्यक्त केला.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 25, 2025 8:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vaishnavi Hagawane Case : आज दिघे साहेब असते तर...? कस्पटे कुटुंबीयांचा एकनाथ शिंदेना थेट सवाल