वंचितच्या सभांचा धडाका सुरू, प्रकाश आंबेडकरांची मुंबईत पहिली सभा, संभाजीनगरात सुजात गरजणार
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
ईशान्य मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची पहिली सभा मुंबईत होत आहे.
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने रंग चढला असून सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा सुरू झाल्या आहेत. मुंबईत यंदा प्रथमच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्याने अनेकांचे लक्ष निवडणुकीकडे लागले आहे. सोमवारी ठाकरे बंधूंची सभा विक्रोळी येथे होत असताना वंचितच्या उमेदवारांसाठी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीची तोफ धडाडणार आहे. वंचित बहुजन आघाडी तर्फे ईशान्य मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
ईशान्य मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची पहिली सभा मुंबईत होत आहे. विक्रोळी पार्क साईटला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंबेडकर हे भाजप आणि ठाकरे बंधूंचाही समाचार घेतील. तसेच आतापर्यंत आघाडीसाठी वाट पाहायला लावणाऱ्या काँग्रेसला देखील चिमटे काढण्याची शक्यता आहे.
संभाजीनगरात सुजात गरजणार
छत्रपकीती संभाजी नगर महापालिका निवडणुकीसाठी सुजात आंबेडकर यांचा 8 आणि 9 जानेवारी रोजी शहरात दोन दिवसीय प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दोन दिवसांत सुजात आंबेडकर शहरातील विविध ११ प्रभागांमध्ये पदयात्रा काढणार असून 6 भव्य जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. 8 जानेवारीला दुपारी 12 वाजता एकता नगरपासून दौऱ्याची सुरुवात होईल, तर रात्री उस्मानपुरा आणि भीमनगर भागात सभा होतील. दुसऱ्या दिवशी, 9 जानेवारीला सकाळी 10 वाजेपासून टाऊन हॉल, कांचनवाडी आणि नक्षत्रवाडी भागात पदयात्रांच्या माध्यमातून ते मतदारांशी संवाद साधतील.
advertisement
वंचित बहुजन आघाडी- मुंबई महानगरपालिका उमेदवारांची यादी
VBA – काँग्रेस आघाडी = 45 वॉर्ड
मैत्रीपूर्ण लढत = 5 वॉर्ड
1. वार्ड 24 – सरोज दिलिप मगर
2. वार्ड 27 – संगिता दत्तात्रय शिंगाडे
3. वार्ड 38 – तेजस्विनी उपासक गायकवाड
4. वार्ड 42 – रेवाळे मनिषा सुरेश
5. वार्ड 53 – नितीन विठ्ठल वळवी
advertisement
6. वार्ड 54 – राहुल ठोके
7. वार्ड 56 – ऊषा शाम तिरपुडे
8. वार्ड 67 – पिर महमंद मुस्ताक शेख
9. वार्ड 68 – पलमजित सिंह गुंबंर
10. वार्ड 73 – स्नेहा मनोज जाधव
11. वार्ड 76 – डॉ. परेश प्रभाकर केळुस्कर
12. वार्ड 85 – अय्यनार रामस्वामी यादव
advertisement
13. वार्ड 88 – निधी संदीप मोरे
14. वार्ड 95 – विनोद कुमार रामचंद्र गुप्ता
15. वार्ड 98 – सुदर्शन पिठाजी येलवे
16. वार्ड 107 – वैशाली संजय सकपाळ
17. वार्ड 108 – अश्विनी श्रीकांत पोचे
18. वार्ड 111 – अँड रितेश केणी
19. वार्ड 113 – सुर्यकांत शंकर आमणे
advertisement
20. वार्ड 114 – सिमा निनाद इंगळे
21. वार्ड 118 – सुनिता अंकुश वीर
22. वार्ड 119 – चेतन चंद्रकांत अहिरे
23. वार्ड 121 – दिक्षिता दिनेश विघ्ने
24. वार्ड 122 – विशाल विठ्ठल खंडागळे
25. वार्ड 123 – यादव राम गोविंद बलधर
26. वार्ड 124 – रीता सुहास भोसले
advertisement
27. वार्ड 127 – वर्षा कैलास थोरात
28. वार्ड 139 – स्नेहल सोहनी
29. वार्ड 146 – सतिश वामन राजगुरू
30. वार्ड 155 – पवार ज्योती परशुराम
31. वार्ड 157 – सोनाली शंकर बनसोडे
32. वार्ड 160 – गौतम भिमराव हराळ
33. वार्ड 164 – आशिष प्रभु जाधव
34. वार्ड 169 – स्वप्निल राजेंद्र जवळगेकर
advertisement
35. वार्ड 173 – सुगंधा राजेश सोंडे
36. वार्ड 177 – कुमुद विकास वरेकर
37. वार्ड 193 – भुषण चंद्रशेखर नागवेकर
38. वार्ड 194 – शंकर गुजेटी (अशोक गुजेटी)
39. वार्ड 195 – पवार ओमकार मोहन
40. वार्ड 196 – रचना अविनाश खुटे
41. वार्ड 197 – डोळस अस्मिता शांताराम
42. वार्ड 199 – नंदिनी गौतम जाधव
43. वार्ड 202 – प्रमोद नाना जाधव
44. वार्ड 207 – चंद्रशेखर अशोक कानडे
45. वार्ड 225 – विशाल राहुल जोंजाळ
--------------------------------------
मैत्रीपूर्ण लढत असलेले वॉर्ड आणि उमेदवार
46. वार्ड 116 – राजकन्या विश्वास सरदार
47. वार्ड 125 – सुमित कासारे
48. वार्ड 133 – सुप्रीया मनोज जाधव
49. वार्ड 140 – सोहन दादु सदामस्त
50. वार्ड 181 – अजिंक्य पगारे
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 7:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वंचितच्या सभांचा धडाका सुरू, प्रकाश आंबेडकरांची मुंबईत पहिली सभा, संभाजीनगरात सुजात गरजणार










