Pitru Paksha 2025: विक्रेते जोमात तर ग्राहक कोमात! भाज्यांचे दर वाढण्यामागे काय आहे कारण?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Pitru Paksha 2025: नवरात्रौत्सवात उपवास सुरू होतात, तेव्हा भाजीपाल्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
मुंबई: सध्या हिंदू धर्मात अतिशय महत्त्व असलेला पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्षाचा भाजीपाला मार्केटवर परिणाम झाल्याचं दिसत आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचे दर कडाडले असून बहुतांश भाज्या महागल्या आहेत. पितृपक्षात, पितरांसाठी जेवण आणि पूजनासाठी भाज्यांच्या मोठ्या प्रमाणात वापर होतो. परिणामी, मागणी वाढल्याने भाज्यांच्या दरात 20 ते 30 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पितृ पक्षात पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी फ्लॉवर, गवार, भेंडी, कारले, लाल भोपळा, वटाणा, कच्ची केळी आणि इतर भाजांची गरज भासते. सध्या बाजारात या भाज्यांची मागणी वाढली आहे. तर, सततच्या पडणाऱ्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. परिणामी एपीएमसीत भाज्यांची आवक कमी मागणी वाढली आहे.
advertisement
मेथी, पालक, कोंथिबीर आणि इतर पालेभाज्यांचे दर 20 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत. किरकोळ भाज्यांच्या दरावर कोणतंही नियंत्रण नसल्याने विक्रते दुप्पत ते तिप्पट दराने विक्री करत आहेत. मुंबई एपीएमसीतील भाजीपाला व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला बाजारपेठेपर्यंत पोहचलेला नाही. भाजीपाला नियमन मुक्त असल्यामुळे बहुतांश विक्रेते मनाचा भाव लावून विक्री करतात.
advertisement
भाज्यांचे घाऊक दर
फ्लॉवर 20 ते 32 रुपये गड्डा, वाटाणा 120 ते 150 रुपये किलो, गवार 60 ते 90 रुपये किलो, भेंडी 60 ते 80 रुपये किलो, कारले 45 ते 60 रुपये किलो, लाल भोपळा 20 ते 35 फोड, फरसबी 40 ते 50 रुपये किलो, घेवडा 40 ते 50 रुपये किलो. किरकोळ बाजारात हे दर यापेक्षा जास्त आहेत. पितृपक्षात भाज्यांचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. नवरात्रौत्सवात भाज्यांचे दर कमी होण्याचा अंदाज आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 10:19 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pitru Paksha 2025: विक्रेते जोमात तर ग्राहक कोमात! भाज्यांचे दर वाढण्यामागे काय आहे कारण?