Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता? चितेगावात विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याचं काम सुरू आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र, अद्याप ते काम पूर्ण झालेलं नाही.
छत्रपती संभाजीनगर: सध्या महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी अगोदर वाईट असलेल्या रस्त्यांची स्थिती आणखी दयनीय झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पैठण तालुक्यातील चितेगाव येथील नागरिक आणि विद्यार्थीसुद्धा सध्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त आहेत.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याचं काम सुरू आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र, अद्याप ते काम पूर्ण झालेलं नाही. आता रस्त्यावर तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचलं आहे. यामुळे पैठण रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. साचलेल्या पाण्यामधून वाहनं काढण्यासाठी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. संथ गतीने सुरू असलेल्या रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं, अशी मागणी ग्रामस्थांनकडून केली जात आहे.
advertisement
ग्रामस्थ शिवाजी फांदडे लोकल 18 शी बोलताना म्हणाले, "पैठण रोडवरील चितेगाव येथे पावसाळ्यात ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रस्त्यांची दुरावस्था ही सर्वात प्रमुख समस्या आहे. चितेगाव-पैठण रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा."
advertisement
चितेगावमध्ये संत एकनाथ विद्यालय आहे. या शाळेत आजूबाजूच्या परिसरात मोठे-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमधून आणि पावसाच्या साचलेल्या पाण्यामधून आपला जीव मुठीत धरून विद्यार्थी शाळेला येतात. विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागतो. शाळेत सुद्धा पाणी साचलेलं आहे. प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Aug 16, 2025 1:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता? चितेगावात विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास






