Dahihandi 2025: यंदा 46 ठिकाणी रंगणार गोविंदांचा थरार, 1600 पोलीस कर्मचारी तैनात
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Dahihandi 2025: दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक ठिकाणी रस्ते बंद असतील. त्यासोबतच शहरात ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर: सालाबादप्रमाणे यावर्षी देखील कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. आज (शुक्रवार) जन्माष्टमी असून शनिवारी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी दहीहंडी आयोजकांनी जोरदार तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक ठिकाणी रस्ते बंद असतील. त्यासोबतच शहरात ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. शुक्रवारी प्रमुख 10 मंदिरांत जन्माष्टमी उत्सव साजरा होणार असून शनिवारी 46 ठिकाणी गोविंद पथकं हंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संख्याकाळी 5 वाजल्यानंतर काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. नागरिकांना रात्री 10 वाजेपर्यंत थरारक दहीहंडी उत्सवाचा आनंद घेता येईल. कायदा व सुव्यवस्थेसाठी शहरात 1600 पोलीस कर्मचारी तैनात आहे. गेल्यावर्षी 55 मंडळांनी दहीहंडी ठेवली होती. यंदा गुरुवारपर्यंत 46 मंडळांनी पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज सादर केले होते. यापैकी गुलमंडीवरील भव्य दहीहंडीचे आयोजन रद्द करण्यात आलं आहे.
advertisement
शनिवारी दुपारनंतर दहीहंडी फोडण्यासाठी पथकांकडून थर रचण्यास सुरुवात होईल. रात्री दहा वाजेपर्यंत यासाठी परवानगी दिलेली आहे. तसेच सर्व मंडळाच्या आवाजाची मर्यादेखील निश्चित करण्यात आलेली आहे. सर्व आयोजकांनी या नियमांचं पालन करावं, असं पोलिसांनी आवाहन केलं आहे. 17 ध्वनी क्षेपणयंत्राद्वारे आवाजाची मोजणी करून मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळावरती कडक कारवाई करण्यात येईल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
advertisement
शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये जन्माष्टमी उत्सव
कुंभारवाड्यातील अमृतेश्वर मंदिर, एन-1 मधील इस्कॉन राधाकृष्ण मंदिर, चेलीपुऱ्यातील बालाजी मंदिर, बेगमपुरा, चिकलठाणा, दिवाण देवडी, कांचननगर, उस्मानपुऱ्यातील श्रीकृष्ण मंदिर, चौराहा, पैठण रस्त्यावरील महानुभाव आश्रम, दौलताबादच्या अब्दीमंडीतील राधामुकुंद मंदिर, या प्रमुख मंदिरांमध्ये जन्माष्टमीनिमित्त मोठे सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय विविध वसाहतींतील मंदिरांमध्येही हा सण साजरा होईल.
advertisement
दहीहंडीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक संघटना, पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते दहीहंडीच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेत आहे. छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी 15 महिला अधिकारी आणि अंमलदारांचे स्वतंत्र पथक गस्तीवर असेल. याशिवाय, 5 सहाय्यक पोलीस आयुक्त, 500 होमगार्ड, 30 पोलीस निरीक्षक, 70 सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक, 143 पोलीस अंमलदार ड्युटीवर तैनात असतील. टी.व्ही. सेंटर, गांधी चौक, सिटी चौक, किराडपुरा, कॅनॉट प्लेस, निराला बाजार, औरंगपुरा, उस्मानपुरा, गजानन महारा मंदिर चौकात दंगल नियंत्रण पथकासह एसआरपीएफचे जवान उपस्थित असणार आहेत.
advertisement
शनिवारी संध्याकाळी बंद असणारे मार्ग
view commentsहडको कॉर्नर ते टी.व्ही. सेंटर चौक, एस.पी. ऑफिस मेस, संपूर्ण कॅनॉट प्लेस, सेव्हन हिल उड्डाणपूल, गजानन महार मंदिर चौक ते जवाहरनगर पोलीस ठाण्यासमोरील चौक, त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर चौक, एस.एस.सी बोर्ड, कोकणवाडी चौकम विट्स हॉटेलपर्यंत, पैठण गेट, सिटी चौक, बाराभाई ताज्जि चौक, गुलमंडी, औरंगाबाद बुक डेपो गुलमंडी मार्ग इत्यादी मार्ग शनिवारी वाहतुकीसाठी बंद असतील.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 15, 2025 4:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dahihandi 2025: यंदा 46 ठिकाणी रंगणार गोविंदांचा थरार, 1600 पोलीस कर्मचारी तैनात


