Pune Traffic: दहीहंडी उत्सवामुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते बंद राहणार, पर्यायी मार्ग
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Traffic: श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. काही रस्ते 2 दिवस बंद राहतील.
पुणे : श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दोन दिवस मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या आदेशानुसार 15 आणि 16 ऑगस्ट रोजी शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, टिळक रोड या मध्यवर्ती भागात वाहतूक बंद किंवा वळविण्यात येणार आहे.
बंडगार्डन विभागातील बदल
16 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल केला जाईल. तीन तोफा चौक ते ब्ल्यू नाईल चौक इस्कॉन मंदिरासमोर जाणारा मार्ग बंद राहील. या मार्गासाठी ब्ल्यू नाईल चौक ते तीन तोफा चौक हा मार्ग दुतर्फा खुला करण्यात आला आहे.
advertisement
कोंढवा विभागातील बदल
कोंढवा वाहतूक विभागात 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 पासून ते 16 ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत गगन उन्नती चौक व केसर लॉजजवळील यू-टर्न बंद राहतील. खडीमशिन पोलिस चौकी ते श्रीराम चौक या रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात येईल. पर्यायी मार्गासाठी खडीमशिन चौकातून यू-टर्न घेऊन इस्कॉन मंदिराच्या पार्किंगकडे वळावे, अशी सूचना पोलिसांनी दिली आहे. तसेच मंतरवाडी फाटा ते कात्रज चौक दरम्यान जड वाहतूकही आवश्यकतेनुसार बंद केली जाईल.
advertisement
वानवडी विभागातील बदल
16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत शिवरकर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गासाठी वाहनांनी संविधान चौकातून डावीकडे वळून सनग्रेस स्कूल मार्गे साळुंखे विहार रोडने प्रवास करावा. तसेच संविधान चौकाकडून उजवीकडे जाणारी वाहने फ्लॉवर व्हॅली लेनकडून केदारी पेट्रोलपंपाकडे जातील. साळुंखे विहार रोडवरून येणारी वाहने उजवीकडे वळून त्याच मार्गाने पुढे जातील. दारुवाला पूल, देवजीबाबा चौक आणि फडके हौद चौक येथील वाहतूक पूर्णपणे बंद असेल.
advertisement
फरासखाना आणि विश्रामबाग विभागातील बदल
16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत अनेक महत्त्वाच्या मार्गांवर बदल करण्यात येणार आहेत. शिवाजी रोडवरून स्वारगेटला जाणारी वाहतूक स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडमार्गे टिळक रोड किंवा शास्त्री रोडवर वळवण्यात येईल. पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक टिळक रोडमार्गे अलका टॉकीज चौक आणि एफ.सी. रोडवरून जाईल. तसेच बुधवार चौकातून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक असेल, परंतु उलट दिशेने जाणारा मार्ग बंद राहील. सोन्या मारुती चौक ते सेवासदन चौक मार्ग बंद असेल, त्याऐवजी उजवीकडे फडके हौद चौकाकडे वळावे लागेल.
advertisement
दहीहंडी उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात 10 पोलिस उपायुक्त, 16 सहायक पोलिस आयुक्त, 80 पोलिस निरीक्षक, 350 उपनिरीक्षक आणि तब्बल 3500 पोलिस कर्मचारी सहभागी असतील.
वाहनचालकांनी अपोलो टॉकीज, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल आणि दुधभट्टी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागरिकांनी संयम राखून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 15, 2025 12:09 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic: दहीहंडी उत्सवामुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते बंद राहणार, पर्यायी मार्ग