Pune Metro: पुणेकरांसाठी खूशखबर, आता मेट्रो दर 6 मिनिटांनी धावणार, 64 फेऱ्या वाढणार!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Metro: वाहतूक कोंडीने हैराण पुणेकरांसाठी खूशखबर आहे. आता मेट्रो दर 6 मिनिटांनी धावणार असून रोज 554 फेऱ्या होणार आहेत.
पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गर्दीच्या वेळेत आता पुणे मेट्रोची फेरी दर सहा मिनिटांनी येणार आहे. आतापर्यंत सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 या गर्दीच्या वेळेत मेट्रो दर सात मिनिटांनी धावत होती. मात्र 15 ऑगस्टपासून ही सेवा अधिक जलद होणार असून, दर सहा मिनिटांनी एक मेट्रो उपलब्ध होईल. तर विनागर्दीच्या वेळेत मेट्रो दर दहा मिनिटांनी धावेल.
सध्या पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिका मिळून एकूण 490 फेऱ्या घेत आहेत. नव्या बदलांमुळे आणखी 64 फेऱ्यांची भर पडणार असून, एकूण फेऱ्यांची संख्या 554 इतकी होईल. त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही आणि प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
Pune Traffic: पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, डबल डेकर उड्डाणपुलाची एक बाजू लवकरच खुली होणार
advertisement
महामेट्रोकडून या बदलासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. यासाठी अनेक चाचण्या घेण्यात आल्या आणि सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आणि गर्दीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही फेऱ्यांची संख्या वाढवली आहे. आता प्रत्येक सहा मिनिटांनी मेट्रो येणार असल्याने प्रवाशांना सोयीस्कर सेवा मिळेल.
advertisement
जुलैमध्ये मेट्रोला प्रचंड प्रतिसाद
जुलै महिन्यात पुण्यातील मेट्रो प्रवासाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या महिन्यात दैनंदिन प्रवासी संख्या तब्बल 1,92,000 इतकी होती. ऑगस्ट महिन्यात ही संख्या आणखी वाढली असून, आतापर्यंत सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या 2,13,620 इतकी आहे. या आकड्यांवरून पुणेकरांचा मेट्रो प्रवासावरील विश्वास आणि पसंती सातत्याने वाढत असल्याचे दिसते.
पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास हा केवळ जलदच नाही तर वेळेची मोठी बचत करणारा ठरत आहे. वाहतुकीच्या कोंडीमधून सुटका करण्यासाठी मेट्रो हा उत्तम पर्याय ठरत आहे. गर्दीच्या वेळी कमी अंतरावर मेट्रो उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांना प्रवास अधिक आरामदायी होईल.
advertisement
दरम्यान, या नव्या बदलामुळे पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सोय होणार असून, मेट्रोची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता आहे. गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो धावण्याचा निर्णय हा पुणे मेट्रोसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 14, 2025 8:58 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro: पुणेकरांसाठी खूशखबर, आता मेट्रो दर 6 मिनिटांनी धावणार, 64 फेऱ्या वाढणार!