Walmik Karad : टायरे जाळले, टॉवरवर चढले, अंगावर रॉकेल ओतून...,7 मुद्यांमध्ये समजून घ्या धगधगत्या परळीत काय सूरू आहे?
- Published by:Prashant Gomane
 
Last Updated:
वाल्मिक कराडचं पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.दरम्यान आज दिवसभरातल्या परळीत काय काय घडलं? हे 7 मुद्यांमध्ये समजून घ्या.
Walmik Karad Custody : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात संशयित वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केज कोर्टाने हा निकाल दिला आहे. त्याचसोबत वाल्मिक कराड याच्यावर 302 च्या गुन्ह्यात मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी दिली..त्यामुळे वाल्मिक कराडचं पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.दरम्यान आज दिवसभरातल्या परळीत काय काय घडलं? हे 7 मुद्यांमध्ये समजून घ्या.
कराडच्या आईचा पोलिस स्टेशनसमोर ठिय्या
वाल्मिक कराडच्या सुटकेसाठी त्यांच्या मातोश्री पारूबाई कराड या मैदानात उतरल्या होत्या. पारूबाई यांनी कराड समर्थकांसह आज पोलिस ठाण्याबाहेर सकाळपासूनच ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली होती.यावेळी त्याची साथ द्यायला कराडच्या पहिल्या पत्नी आणि सून देखील उपस्थित होत्या. या दरम्यान तब्बल 3 तास आंदोलन सूरू असताना पारूबाई कराड यांना भोवळ आली होती.त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती.
advertisement
कराड समर्थक सकाळपासून आक्रमक
दरम्यान कराड समर्थकांनी आज परळीत जोरदार आंदोलन केलं होतं. परळी टॉवर या ठिकानी जरांगे पाटील, सुरेश धस,संदीप क्षीरसागर,जितेंद्र आव्हाड,अंजली दमानिया यांना कराड समर्थकांनी श्रद्धांजली वाहून अनोखे आंदोलन करण्यात आले. तसेच वैद्यनाथ मंदिराच्या कमानीवर चढून कराड समर्थकांनी आंदोलन करत निशेष नोंदवला होता. तसेच बीडच्या परळी मध्ये कराड समर्थक आक्रमक संदीप क्षीरसागर सुरेश धस यांचा फोटोला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला होता. एका कराड समर्थक महिलेने अंगावर रॉकेल घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच परळी बीड राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटून निषेध नोंदवण्यात आला.
advertisement
कराडवर जातीवाद आणि राजकारण होतेय
त्यांचा (वाल्मिक कराड ) खंडणी आणि खून प्रकरणात कुठलाही सहभाग नाही पण आंदोलन आणि वेठीस धरून गुन्हा दाखल होणार असतील तर हे प्रकार चांगले नाहीत. जाणून बुजून कारवाई करायला लावणार असतील तरे हे थांबले पाहिजे.
पोलीस आणि सरकार अशी कारवाई कशामुळे करतंय, असे विचारले असता त्या म्हणाल्या- पूर्णपणे या प्रकरणात जातीयवाद केला जातोय. जातीवादाशिवाय दुसरा काहीही विषय नाही. गुन्हेगाराला जात नसते. पोलिसांना तपास करायचा असल्यास करावा पण जात मध्ये आणून तुम्ही काय साध्य करताय. ते दोषी नाहीयेत, अशी बाजू वाल्मिक कराडच्या पत्नीने माध्यमांसमोर मांडली.
advertisement
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
दरम्यान वाल्मिक कराड यांना खंडणी प्रकरणात 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज याची मुदत संपत असल्याने केजच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यासोबत त्यांच्यावर मकोकही दाखल करण्यात आला आहे.
कराडचे वकील काय म्हणाले?
सरकारी वकिलांनी वाल्मिक कराड यांची १० दिवसांची पोलीस कोठडी पाहिजे, अशी मागणी केली होती. ज्यावेळी पहिल्यांदा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते, त्यावेळी जे मुद्दे सांगून पोलीस कोठडी घेतली, तेच मुद्दे आताही सांगून पोलीस कोठडी मागितली गेली. परंतु न्यायालयाने सरकारी वकिलांना फटकारून त्यांची पोलीस कोठडी न देता त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यांच्यावर तूर्त तरी मकोका लागलेला नाही, असे वाल्मिकच्या वकिलांनी सांगितले.
advertisement
वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा
खंडणी प्रकरणात न्यायालयाने वाल्मिकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. परंतु त्याचवेळी एसआयटीने हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून त्याप्रकरणी चौकशी करायची आहे, असे सांगून कोठडीची मागणी केली आहे. वाल्मिक कराड याच्यावर 302 च्या गुन्ह्यात मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी दिली.
advertisement
परळी बंदची हाक
दरम्यान कोर्टाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कराड समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी कराड सरर्थकांनी परळी बंदची हाक दिली होती. त्यामुळे परळीच वातावरण चांगलच चिघळलं आहे .
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
January 14, 2025 4:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Walmik Karad : टायरे जाळले, टॉवरवर चढले, अंगावर रॉकेल ओतून...,7 मुद्यांमध्ये समजून घ्या धगधगत्या परळीत काय सूरू आहे?


