Walmik Karad : कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर आलिशान प्रॉपर्टी, मालमत्ताच्या कागदपत्रातून धक्कादायक खुलासा
- Published by:Prashant Gomane
 
Last Updated:
वाल्मिक कराडने गुन्हेगारी मार्गाने कमावलेल्या पैशातून पुण्यात दोन ऑफिसस्पेस खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावे ही प्रॉपर्टी आहे.
Walmik Karad, Jyoti Jadhav Pune Property : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित असलेल्या वाल्मिक कराडबाबत अनेक खळबळजनक माहिती समोर येतेय. त्यात आता वाल्मिक कराडने गुन्हेगारी मार्गाने कमावलेल्या पैशातून पुण्यात दोन ऑफिसस्पेस खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावे ही प्रॉपर्टी आहे. कोट्यवधीच्या घरात या प्रॉपर्टीची किंमत आहे. या संपूर्ण मालमत्तांचे आता कागदपत्रे समोर आली आहेत. त्यामुळे या प्रकरणात ईडीची एंन्ट्री होऊन कारवाई होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयासमोर वाल्मिक कराड यांनी दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ज्योती जाधव यांच्या नावे सहाव्या मजल्यावर क्रमांक 610 सी ही 46.71 चौरस मीटर क्षेत्रफळाचं ऑफिस खरेदी केलं आहे. तसेच सहाव्या मजल्यावर 611 बी हे आणखी एक ऑफिसही ज्योती जाधव यांच्या नावे खरेदी केले आहे. या कोट्यावधी ऑफिस स्पेसची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत.
advertisement
दरम्यान वाल्मिक कराड आणि टोळीच्या वर्चस्वाला जसा दहशतीचा आधार आहे, तसाच या दहशतीतून निर्माण झालेल्या पैशातून या टोळीने राज्यभरात जे उद्योग आणि धंदे सुरू केलेत त्यातून मिळणाऱ्या पैशांचं पाठबळ आहे म्हणून दहशतीचं हे वर्चस्व मोडून काढायचं असेल तर या अशा आर्थिक स्रोतांवर देखील कारवाई व्हायला हवी. त्यातूनच ईडी अर्थात एन्फोर्समेंट डिरेक्टरेटच्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
January 14, 2025 12:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Walmik Karad : कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर आलिशान प्रॉपर्टी, मालमत्ताच्या कागदपत्रातून धक्कादायक खुलासा


