Wardha Accident: भरधाव कारची उभ्या ट्रकला धडक, गाडीचा चक्काचूर, 3 मृतदेह बाहेर काढण्यासाठी कसरत

Last Updated:

धोत्रा-अल्लीपूर मार्गावर भरधाव कारने ट्रकला धडक दिल्याने वैभव शिवणकर, निशांत वैद्य, गौरव गावंडे यांचा मृत्यू, भूषण वडणेरकर गंभीर जखमी. परिसरात हळहळ.

News18
News18
नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा: बुधवार घातवार ठरला, पौर्णिमेनिमित्ताने स्नानासाठी जाणाऱ्या 8 जणांना एक्सप्रेसनं उडवलं तर दुसरीकडे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हादरवून टाकणारी एक भीषण घटना धोत्रा-अल्लीपूर मार्गावर घडली. भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका गंभीर होता की, यात कारमधील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही कार धोत्रा बाजूकडून अल्लीपूरच्या दिशेने जात होती. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे किंवा वेगामुळे स्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला कारने मागून जबर धडक दिली. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. ट्रकला धडक बसताच कारचा समोरील भाग पूर्णतः चेंदामेंदा झाला. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कारचे झालेले नुकसान पाहता, आतील प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले.
advertisement
या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या वैभव शिवणकर, निशांत वैद्य आणि गौरव गावंडे या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामध्ये कारमधील चौथा तरुण भूषण वडणेरकर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ घटनास्थळावरून हलवून उपचारासाठी सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर तातडीचे उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या अपघातामागील नेमके कारण काय होते आणि ट्रक रस्त्यावर कसा उभा होता, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या अपघातामुळे धोत्रा-अल्लीपूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Wardha Accident: भरधाव कारची उभ्या ट्रकला धडक, गाडीचा चक्काचूर, 3 मृतदेह बाहेर काढण्यासाठी कसरत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement