पेन ड्राईव्ह उद्धव ठाकरेंकडे, अरविंद सावंतांवर गंभीर आरोप, ठाकरे सेनेला धक्का, नेत्याचा राजीनामा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
निहाल पांडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे सेनेतील काही नेते भाजपसोबत मिळून काम करत असल्याचा गंभीर आरोप केला.
नरेंद्र मते, प्रतिनिधी, वर्धा : वर्ध्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांची मालिका वेगात सुरू असून जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटातून मोठी घडामोड समोर आली आहे. अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केली असतानाही मुंबई आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या गटबाजीमुळे अनेकांना ए–बी फॉर्म नाकारण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील पुरावे त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले आहेत. जिल्ह्यात झालेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर वर्धा उपजिल्हा प्रमुख निहाल पांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे.
निहाल पांडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे सेनेतील काही नेते भाजपसोबत मिळून काम करत असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच निवडणुकीत भाजपला थेट फायदा होईल अशा दिशेने योजना रचली जात असल्याचेही ते म्हणाले.
मुंबईतील एका जेष्ठ नेत्याकडून कुरघोडीचे राजकारण, त्याचा नाडा टाईट करण्याची वेळ
ठाकरे सेनेतील पाय खेचाखेचीच्या प्रवृत्तीला कंटाळून मी हा निर्णय घेतला. मुंबईतील एका जेष्ठ नेत्याकडून कुरघोडीचे राजकारण सुरू असून त्या नेत्याचा नाडा ढिल्ला झालाय आणि आता तो टाईट करण्याची वेळ आली आहे, असे म्हणत अरविंद सावंत यांचे नाव न घेता त्यांनी निशाणा साधला.
advertisement
उद्धव ठाकरेंकडे पेनड्राईव्ह जमा, राज समोर आले तर खळबळ उडेल
पांडे यांनी केलेल्या दाव्यानुसार, ठाकरे गटातील अनेक नेत्यांच्या बेकायदेशीर कामांचा पुरावा असलेली एक पेन ड्राईव्ह त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जमा केली आहे. या पेन ड्राईव्हमधील राज उघड झाले, तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
Nov 22, 2025 3:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पेन ड्राईव्ह उद्धव ठाकरेंकडे, अरविंद सावंतांवर गंभीर आरोप, ठाकरे सेनेला धक्का, नेत्याचा राजीनामा










