OBC Melava : मंत्री छगन भुजबळांसह आ. गोपीचंद पडळकरांनी OBC सभेकडे फिरवली पाठ, कारण आलं समोर

Last Updated:

OBC Melava : वर्धा जिल्ह्यात होणाऱ्या ओबीसी एल्गार सभेला मंत्री छगन भुजबळ आणि आमदार गोपिचंद पडळकर अनुपस्थित राहणार आहेत.

OBC सभेकडे फिरवली पाठ
OBC सभेकडे फिरवली पाठ
वर्धा, 16 डिसेंबर (नरेंद्र मते, प्रतिनिधी) : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध करत ओबीसी मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अनेक ओबीसी मेळाव्यांमध्ये आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला आहे. मात्र, आज वर्धा जिल्ह्यात होणाऱ्या ओबीसींच्या महाएल्गार सभेला मंत्री छगन भुजबळ आणि भाजप नेते गोपिचंद पडळकर गैरहजर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विदर्भातील पहिली ओबीसी एल्गार सभा वर्ध्यामध्ये होत आहे. वर्धा शहरातील जुन्या आरटीओ ऑफिसच्या मैदानावर सकाळी 11 वाजता ही सभा सुरू होणार होती. मात्र, भुजबळ, पडळकर यांच्यासारख्या नेत्यांनी अचानक दांडी मारल्याने ही सभा सुरू व्हायला दुपारचा एक वाजला. विदर्भातील ही पहिली ओबीसी एल्गार सभा असून सभेला एका लाखांच्या जवळपास ओबीसी बांधव उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांनी सांगितले होतं.
advertisement
मंत्री छगन भुजबळ, आ. गोपीचंद पडळकर यांनी फिरवली सभेकडे पाठ
या महाएल्गार सभेला छगन भुजबळ हे मुख्य मार्गदर्शन करणार होते. तर प्रकाशअण्णा शेडगे, महादेव जानकर, खा. रामदास तडस, आ. गोपीचंद पडळकर, डॉ. बबनराव तायवाडे, शब्बीर अन्सारी, प्रा. लक्ष्मण हाके, प्रा. लक्ष्मण गायकवाड व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती राहणार होती. मात्र, आता भुजबळ आणि पडळकर गैरहजर असल्याचे समोर आले आहे. तब्येतीच्या कारणांमुळे छगन भुजबळ यांचा वर्धा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पडळकर यांनी या सभेकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे.
advertisement
मराठा बांधवांना आरक्षण मिळावे; पण ते ओबीसींच्या प्रवर्गातून नाही तर स्वतंत्र आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसोबतच शिंदे समिती बरखास्त करून ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, अशी ओबीसी बांधवांची मागणी आहे. सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरुन आक्रमक भूमिका मांडत जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला होता. मात्र, आज अचानक गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
OBC Melava : मंत्री छगन भुजबळांसह आ. गोपीचंद पडळकरांनी OBC सभेकडे फिरवली पाठ, कारण आलं समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement