मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला? फडणवीसांच्या निशाण्यावर पुन्हा शरद पवार
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांंनी मराठा आरक्षणावरून निशाणा साधला आहे.
मुंबई, 16 डिसेंबर, तुषार रूपनवार : भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी मराठा आरक्षणावरून जोरदार निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध हा शरद पवार यांनी केला, शरद पवारांना आरक्षण कधी द्यायचं नव्हतं त्यांना समाजाला फक्त झुंजवत ठेवायचं होतं, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
'मराठा आरक्षणाला सर्वांधिक विरोध हा शरद पवार यांनी केला, शरद पवारांना आरक्षण कधी द्यायचं नव्हतं त्यांना समाजाला फक्त झुंजवत ठेवायच होतं. आपण मराठा समाजाला आरक्षण दिल आणि हायकोर्टात टिकून ही दाखवलं. मविआच्या काळात सुप्रीम कोर्टात त्यांना आरक्षण टिकवता आलं नाही', असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'आता आपण तीन राज्यांची निवडणूक जिंकल्याने आपलं मनोबल उचावलं आहे. मात्र विरोधीपक्षाचं मनोबल खचलं आहे. विरोधकांना आता देशाची नाही तर स्वत:ची चिंता आहे. येणारे दिवस अत्यंत सावधानतेने आपल्याला काढावे लागणार आहेत. तीन राज्यात मिळालेलेल्या विजयाचा उत्साह आहे. प्रत्येक निवडणूक ही गंभीरतेने घ्यायची आहे. देशातील सामान्य माणसाला खात्री आहे की देशात विकास आणि परिवर्तन मोदीच करू शकतात' असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 16, 2023 12:47 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला? फडणवीसांच्या निशाण्यावर पुन्हा शरद पवार









