भक्तांच्या मनोकामना होतात पूर्ण, अखंड ज्योतीसाठी प्रसिद्ध आहे हे मंदिर, अशी आहे मान्यता Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महाराष्ट्रातील एका दुर्गामातेच्या मंदिरात मनोकामना पुर्तीसाठी अखंड ज्योत लावण्याची परंपरा आहे.
वर्धा, 18 ऑक्टोबर: नवरात्रीत घट आणि अखंड ज्योतींना विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक देवीच्या मंदिरात अखंड ज्योत लावतात. वर्धा शहरातील दुर्गा देवीचं मंदिर अखंड ज्योतींसाठी प्रसिद्ध आहे. शास्त्री चौकातील हनुमान दुर्गा माता मंदिरात हजारो भाविक मनोकामना ज्योत लावतात. गेल्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा असून कोरोना काळापासून ऑनलाइन नोंदणीचे प्रमाण वाढलं आहे. मंदिराच्या वतीने अखंड ज्योतीची कशी तयारी केली जाते? नोंदणी पद्धत कशी होते? याबद्दल महंत मुकेशनाथ महाराजांनी माहिती दिलीय.
भाविकांचा घट आणि अखंड ज्योत
या मंदिरात नोंदणी केलेल्या भाविकांचा घट आणि अखंड ज्योत लावली जाते. भक्तांचा संकल्प बोलला जातो. त्यामुळे अनेकांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, ओडिशा,तामिळनाडू, केरळ, हरियाणा, पंजाब, राजस्थान आंध्र प्रदेश या राज्यातील भाविक देखील याठिकाणी अखंड ज्योती लावून प्रार्थना करतात. काही विदेशात राहणारे भाविक देखील या मंदिरात अखंड ज्योत लावून घेतात, असेही महाराज सांगतात.
advertisement
अशी आहे भाविकांची श्रद्धा
"मी मध्यप्रदेश येथील रहिवासी असून दरवर्षी या मंदिरात मी घट आणि अखंड ज्योत लावते. माझी मनोकामना नेहमी दुर्गा देवी पूर्ण करते. म्हणून या वर्षी माझ्या मुलाच्या नावाने काही संकल्प बोलून याठिकाणी मी ज्योत लावली आहे. जेव्हा जेव्हा मी मंदिरात येऊन पूजा करते, तेव्हा मला दुर्गा देवी माझ्यासोबत बोलत असून मी तिला सांगत असलेलं ती ऐकते असं वाटतं. माझी या देवीवर खूप श्रद्धा आहे," असं महिला भाविक नितू रामसिंग ठाकूर सांगतात.
advertisement
15 दिवसांपासून होते तयारी
अखंड ज्योतीचं हे 23 वे वर्ष असून मंदिरात अखंड ज्योतीसाठी 2 हॉल आहेत. या हॉलची स्वच्छता, घट आणि धान्य, सर्व सामानाची तयारी करण्यासाठी 15 दिवसांपासून सुरवात केली जाते. त्यानंतरही अंदाजे 15 दिवस देखरेख आणि बाकी गोष्टींसाठी मिळून 1 महिना याठिकाणी काही सेवक कामाला ठेवले जातात. त्यांच्या राहण्याची व्यवस्था याठिकाणी केली जाते. सेवक ज्योतीला अखंड ठेवण्याचं काम करतात. रात्र रात्र जागून या ज्योतींवर लक्ष ठेवले जाते. या सेवकांना काही राशी आणि कपडेही भेट दिले जातात, असे मुकेशनाथ महाराज सांगतात.
advertisement
अनेक भाविक दूरवरून होतात सहभागी
अनेक इतर राज्यातील भाविक नातेवाईकांच्या हस्ते देणगी देऊन किंवा ऑनलाईन माध्यमातून देणगी पाठवून मंदिरात स्वतःचा घट आणि अखंड ज्योत लावून घेतात. नवरात्रीच्या दिवसांमध्ये दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच मंदिरात नवरात्रीत सहभागी होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने वर्धेकरही सहभागी होतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
October 18, 2023 10:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
भक्तांच्या मनोकामना होतात पूर्ण, अखंड ज्योतीसाठी प्रसिद्ध आहे हे मंदिर, अशी आहे मान्यता Video